बदलापूर : अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यवर्ती असलेल्या बारवी धारण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने धरणाचे सर्व दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे बारावी नदीपात्राला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बारावी नदीवरील पूल देखील पाण्याखाली आल्याने डॅम मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यवर धरण असून हे बारावी धरण ऑगस्ट महिन्यातच भरून वाहू लागले होते. मात्र गेल्या 24 तासात बारावी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणाचे सर्व दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने बारावी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
बारावी नदीच्या किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून बारवी नदीवरील पुल देखील पाण्याखाली आल्याने या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. दुसरीकडे हेच बारवी धरणाचे पाणी उल्हास नदीला मिळत असल्याने उल्हास नदी देखील भरून वाहू लागले आहे. उल्हास नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.