शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

पाचशे फूट दरीतून दापुऱ्यात आले पाणी; जलपरीची कमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:51 AM

पालकमंत्र्यांची भेट, मराठी तरुणाने सोलर वॉटरपंपाद्वारे साधली किमया

श्याम धुमाळ कसारा : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील पंधरवड्यात शहापूर तालुक्यातील दापूर या अतिदुर्गम अशा आदिवासीवाडीला भेट दिली होती. आदिवासी ग्रामस्थांच्या पाणी, वीज आणि रस्त्यांबाबतच्या समस्या समजल्यानंतर त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. त्यानंतर, प्रशासन कामाला लागले आणि गुरु वारी सायंकाळी गावात तब्बल ५०० फूट खोल दरीतून जलपरीद्वारे पाणी गावात आले. त्यावेळी येथील आदिवासींच्या चेहºयावर हास्य पसरले होते.

शहापूर तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. दरवर्षी लागणाºया टँकरपेक्षा यंदा जास्त टँकरची गरज भेडसावत आहे. तालुक्यातील अनेक गावपाड्यांमधील ग्रामस्थांना तानसा, भातसा, वैतरणा नद्यांतील पाणी डोळ्यांनी दिसते; पण ते खोल दरीत असल्याने हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना तब्बल दोन तासांची पायपीट करून दरीत उतरावे लागते.

दरम्यान, अरुण शिंदे या मराठी तरु णाने विदर्भातील नागपूर, भंडारा, नंदुरबार जिल्ह्यांत पाणीटंचाईविरोधात राबवलेल्या मोहिमेत सोलर वॉटरपंपाच्या माध्यमातून १०० ठिकाणी जलपरी योजना राबवून ग्रामस्थांना पाणी मिळवून दिले आहे. त्याच धर्तीवर शहापूर तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या दापूर या गावात प्रायोगिक तत्त्वावर या जलपरीचे काम शिंदे यांनी सुरू केले होते. नाशिक जिल्ह्यातील ब्ल्यू चिप पॉवर एनर्जी कंपनीत जर्मनी, तैवान या देशांतून सोलरसाठी आवश्यक असलेली साधनसामग्री मागवली जाते. सोलरपंप, डीसीपंप, पवनचक्कीच्या माध्यमातून जलपरी बनवली जाते. दापूर गावाच्या मागील बाजूस असलेल्या वैतरणा नदीपात्रातून तब्बल ५०० फूट दरीतून या जलपरीद्वारे पाणी गावात आणले. याच पद्धतीने तालुक्यातील इतर डोंगराळ भागात पाण्यासाठी जलपरी योजना राबवण्याचा प्रस्ताव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराधीन असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे समजते.

आठ दिवसांत सौरदिव्यांनी दापूरसह सावरखेड लखलखणारदापूरमाळ, सावरखेड या गावांची पाणीसमस्या सोडवण्यात यश आले असून या गावांमध्ये आता लवकरच सौरऊर्जेवर चालणाºया दिव्यांची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. याशिवाय, टंचाईग्रस्त गावपाड्यांत पाच हजार लीटरच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले असून, सुमारे शंभरहून अधिक टाक्या वाटण्यात आल्या आहेत.

पालकमंत्र्यांनी आमच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढला. आमची पाण्याची समस्या त्यांच्या प्रयत्नांमुळे सुटल्यात जमा आहे.- विजय शिंगवा, ग्रामस्थ

प्रायोगिक तत्त्वावर जलपरीची योजना दापूर येथे राबवली आहे. ५०० फूट खोल दरीतून पाणी आणण्यात यश मिळाले आहे. आता गावात पाच हजार लीटरची टाकी बसवून, संपूर्ण गावात नळपाणीयोजना राबवणार आहे. या योजनेचा अंदाजे खर्च सहा ते सात लाख रुपये असून, तो स्वत: मी केला आहे. - अरुण शिंदे, जलपरी पाणीयोजना

टॅग्स :Waterपाणी