- शाम धुमाळ कसारा - कसाऱ्यापासून १५ किमी. अंतरावरील अजनूप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाचे पात्र आहे. येथे मुबलक पाणी साठा असल्याने धरणाच्या पात्रालगत बॅक वॉटरही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, दोन किमी अंतरावरील उठावा गावासह जवळपासच्या दहा गांव पाड्यांना काही याचा उपयोग होत नाही.या गावपाड्यातील गोरगरीब ग्रामस्थ हंडाभर पाण्यासाठी पहाटेच्या सुमारास दरीत उतरतात. एक तास उतरायला तर दरी चढायला दीड तास लागतो. उठावा गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पहाटे पाचच्या सुमारास एक हंडा, कळशी घेऊन बॅटरीच्या प्रकाशात दरीत उतरतात आणि धरणाच्या बॅक वॉटरमधून पाणी भरु न परतीचा मार्ग स्वीकारतात. डोक्यावर हंडाकळशी घेतदरी चढताना या ग्रामस्थांना बराच त्रास सहन करावा लागतो. या गावासह वारली पाडा, बोंडारपाडा, मेंगाळ पाडा, भाकरेपाडा, भस्मेपाडा, काटीचापाडा, गायधरा, कोळीपाडा, अजनूप या गावांना देखील प्रचंड पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असून काही गावात येणारे पाणी टँकर अर्धवट स्थितीत जवळपास खाली केले जातात. हाकेच्या अंतरावर पाणी असताना शासनस्तरावर काहीही उपाययोजना होत नसल्याने आजही शहापूर तालुक्यातील आदिवासी पाण्यासाठी वणवण करत आहेत.पाणीटंचाई दूर करण्यासाठी पर्यायअजनूप कार्यक्षेत्रातील उठावा गावापासून धरणाच्या बॅक वॉटर पाणीसाठ्यापर्यंत जाण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वी बैलगाडी जाण्यासाठीचा ब्रिटीशकालीन रस्ता होता. तो रस्ता जर पूर्ववत केला तर या गावासह अन्य गावपाड्यांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल.आम्हाला दरवर्षी माघ (फेब्रुवारी) पासून भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. हाकेच्या अंतरावर धरण आणि धरणाचे पाणी दिसत असताना ते आम्हाला मिळत नाही, हे आमचे दुर्दैव.- छाया दुभेले, ग्रामस्थ महिला, उठावाबैलगाडीसाठीचा जुना रस्ता पूर्ववत केल्यास बैलगाडीच्या माध्यमातून लोकांना पाणी पुरवठा करता येऊ शकतो. परिणामी, शासनाचा टँकरचा खर्चही वाचू शकतो.- कदम उघडे, सरपंच
हंडाभर पाण्यासाठी डोळ्यात पाणी, बॅटरीच्या प्रकाशात आणावे लागते पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 3:39 AM