शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

ठाणे जिल्ह्यात सर्वत्र बरसल्या जलधारा

By admin | Published: July 16, 2017 2:56 AM

मागील तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९५.८० मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे शहरात

- लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मागील तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९५.८० मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे शहरात सरासरी ८१.५० मिमी पाऊस झाला असून सात घरांचे नुकसान झाले आहे. माळशेज घाटात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शनिवार आणि रविवारी, असे दोन दिवस माळशेज घाटमार्गे होणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पर्यटनप्रेमी नाराज झाले आहेत.काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारपासून पावसाने पुन्हा जोर धरला. शनिवारीही त्याचा जोर जिल्ह्यात कायम होता. जिल्ह्यात २४ तासांत एकूण ६७०.६० मिमी पाऊस झाला आहे. त्यात १६८ मिमी सार्वधिक पाऊस मुरबाड तालुक्यात झाला आहे. त्यापाठोपाठ भिवंडी तालुक्यात ११० मिमी पाऊस झाला आहे. कल्याणमध्ये ९७ मिमी, अंबरनाथमध्ये ९०.६० मिमी, उल्हासनगर ८० मिमी, ठाणे ७२ मिमी आणि सर्वात कमी शहापूर तालुक्यात ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.ठाणे शहरातही मागील २४ तासांत ८१.५० मिमी पाऊस झाला असून विविध भागांत १० झाडे उन्मळून पडली आहेत. टिटवाळा येथील रुंदे गावाजवळील काळू नदीवरील पुलावरून शुक्रवारी पाणी गेले होते. त्यामुळे १०-१२ गावांचा संपर्क तुटला होता. मात्र, शनिवारी या पुलावरील पाणी ओसरल्याने पूल वाहतुकीसाठी खुला झाला. तर, कल्याण-मुरबाड महामार्गावरी टाटा पॉवर हाउससमोरील रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. रेवती गावाजवळ भिंतीवर झाड पडले आहे. रायता-मानिवली रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगरातून माती ढासळू लागल्याचे मानिवलीच्या सरपंच सुनीता गायकर यांनी सांगितले.कळव्यात सात घरे पडली : कळव्याच्या डोंगरावर वसलेल्या घोलाईनगर येथील तीन घरे त्या घराच्या खालील चार घरांवर पडली. त्यात एकूण सात घरांचे नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी झाली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली.