शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

भरावामुळे नेरळ कळंब रस्ता पाण्यात

By admin | Published: June 26, 2017 1:37 AM

शहराला पडलेला बिल्डरचा विळखा येथील नागरी सुविधांच्या मुळावर येत असून, कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत एका बिल्डरने इमारतीसाठी केलेल्या मातीच्या

कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : शहराला पडलेला बिल्डरचा विळखा येथील नागरी सुविधांच्या मुळावर येत असून, कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत एका बिल्डरने इमारतीसाठी केलेल्या मातीच्या भरावामुळे दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसात नेरळ-कळंब रस्ता पाण्याखाली आला आहे. नेरळकडून मुरबाड, नाशिक, नगरला जोडणारा हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. या रस्त्यावरील धामोते गावाजवळील रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला होता. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. पावसामुळे रस्ता खचला तर अनेक गावांचा संपर्क तुटू शकतो, स्थानिक ग्रामपंचायत आणि बांधकाम विभाग या बिल्डरवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डांबरीकरणासाठी नुकतेच या ठिकाणी लाखो रु पये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, जागोजागी उभ्या राहत असलेल्या इमारतींमुळे पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाल्याने पाणी रस्त्यावर आले आहे. यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नेरळ परिसरात कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात निवासी संकुलांचे काम सुरू आहे. ग्रामपंचायत आणि बिल्डरांचे असलेले अर्थपूर्ण संबंध यामुळे बिल्डरांच्या चुकांकडे दुर्लक्षच करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नेरळ परिसरात अशी स्थिती अनेक ठिकाणी असून, याचा भुर्दंड पुन्हा शासनाला सोसावा लागत असल्याने सार्वजनिक हितास बाधक ठरणाऱ्या बिल्डरांवर कारवाईची मागणी वाहनचालक, प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे.