-सदानंद नाईक, उल्हासनगर उल्हासनगर शहरात एकीकडे पाणीटंचाई निर्माण झाली असताना, दुसरीकडे जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. नेताजी गार्डन जवळ गेल्या चार दिवसांपासून जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी दुरस्ती अभावी वाहून जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उल्हासनगर महापालिका पाणी पुरवठा विभागातील अपुऱ्या कर्मचाऱ्या अभावी विकास कामावेळी फुटलेल्या जलवाहिन्या दुरस्ती केल्या जात नाहीत. या जलवाहिन्यातून लाखो लिटर पाणी खाली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
जलवाहिनी कुठे फुटली आहे?
कॅम्प नं-५, नेताजी गार्डन परिसरात जलवाहिनी फुटून गेल्या चार दिवसापासून लाखो लिटर पाणी नालीत जात आहे. असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. तर दुसरीकडे शहरातील विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाली.
सुभाषटेकडी येथील महिला व नागरिकांनी एकत्र येत महापालिकेचा निषेध करून मातीचे मडके फोडले. संतोषनगर, तानाजीनगर परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, स्थानिक नागरिकांनी महापालिकेला निवेदन देत आंदोलनाची भूमिका घेतली.
जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्ती, पाणीपुरवठा बंद
एमआयडीसीचे म्हारळ गाव शहाड गावाठाण येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दुरस्तीचे काम शुक्रवारी काढल्याने, दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार आहे. असे महापालिकेकडून सांगण्यात आले.
शहरांत भुयारी गटार, रस्ते बांधणी, पाणी पुरावठा योजना यासह अन्य विकास कामे सुरु असून रस्ते खोदले जात असल्याने, जलवाहिन्या फुटल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तर महापालिकेकडे कर्मचारी वर्ग कमी असल्याने, फुटलेल्या जलवाहिन्या अनेक दिवस दुरस्ती केली जात नाही. फुटलेल्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी खाली जात असून अशी परीस्थिती संपूर्ण शहरांत निर्माण झाली आहे.
दुरस्तीचे काम जलदगतीने
महापालिका पाणी पुरवठा विभागाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असलातरी विविध माध्यमातून फुटलेल्या जलवाहिन्या दुरस्तीचे काम केले जाते, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी सांगितले.