ठाणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाकडून दैनंदिन देखभाल दुरु स्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. या कामांमुळे बुधवारपासून पुढील ३६ तासांसाठी स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे ठाणोकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
दुसरीकडे पाणी पुरवठा बंद असलेल्या भागात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून विभागवार करण्यात आलेल्या या नियोजनामुळे नागरिकांना ३६ ऐवजी १२ तास पाणी मिळणार नसल्याचा दावा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला आहे.
स्टेम प्राधिकरणाच्या योजनेतील दैनंदिन देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी बुधवारी सकाळी ९ ते गुरूवार रात्नी ९ असा ३६ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे स्टेमकडून ठाणो महापालिकेला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे ठाणोकरांचे हाल होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणो महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने या कालावधीत स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा सुरु ठेवून त्याचे विभागवार नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियोजनामुळे नागरिकांना ३६ ऐवजी १२ तास पाणी मिळणार नसल्याचा दावा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला आहे.
नव्या नियोजनानुसार बुधवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत घोडबंदर रोड, माजिवडा-मानपाडा, ब्रह्मांड, विजयनगरी, पातलीपाडा, साकेतचे नवीन कनेक्शन या भागातील पाणीपुरवठा १२ तासांसाठी बंद राहणार आहे. बुधवार रात्री ९ ते गुरूवार सकाळी ९ वाजेपर्यंत गांधीनगर, सुरकुरपाडा, उन्नती, सिद्धांचल, समतानगर, सिध्देश्वर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी या भागात १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच गुरूवार सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यत इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, रामनगर, मुंब्रा व कळव्याचा काही भाग, खारेगाव, रुस्तमजी, साकेत, जेल, ऋतूपार्क या भागात १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे.