टिटवाळा : शहरात मंगळवारी दुपारी झालेल्या तासाभराच्या पावसामुळे इंदिरानगर परिसरातील चाळींमधील ३० ते ३५ घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे तेथील रहिवाशांच्या सामानाचे नुकसान झाल्याने त्यांंना आर्थिक फटका बसला आहे.
पूर्वेतील इंदिरानगर परिसरात जी. आर. पाटील शाळेच्या मागील परिसरात इंदिरानगर, घोटसई, नांदप टेकडी परिसरातील पावसाचे पाणी वाहून येते. मंगळवारी दुपारच्या सुमारास पडलेल्या अवघ्या तासाभराच्या पावसाने पाणीच पाणी झाले. चाळीतील ३० ते ३५ घरामध्ये पावसाचे पाणी शिरले.
दरम्यान, नैसर्गिक नाल्याचा प्रवाह मातीचा भराव घालून बेकायदा चाळी बांधल्या जातात. पाण्याचा निचारा होण्यास जागा न मिळल्याने दोन चाळींमधील मोकळ्या जागेतून पावसाचे पाणी वाहते. त्याचा फटका चाळीतील रहिवाशांना बसतो, असे जाणकारांनी सांगितले. केडीएमसीने नाल्यासाठी डी.पी. तयार करून नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह बदलण्यावर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे, अशी मागणी यानिमित्ताने जोर धरत आहे.
-------------