शाम धुमाळ
कसारा : दिवाळीमुळे असलेली प्रवाशांची तुफान गर्दी यात रेल्वे स्थानकावर पाणी बॉटल मिळत नसल्याने प्रवाशांच्या घशाला कोरड पडलेली असताना प्रवाशांना पाणी बॉटल ऐवजी थंड पेय घेण्यास भाग पडत असल्याने सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. मद्य रेल्वेच्याठाणे रेल्वे स्थानकावर मुबंई उपनगरासह बाहेरगावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते दरम्यान सध्या दिवाळी सुठ्या मुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील 1 ते 10 रेल्वे स्थानक प्रवाशाच्या गर्दीमुळे फुलून गेले होते. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यत सर्वांचीच तुफान गर्दी रेल्वे स्थानकावर पाहावयास मिळत आहे.
रेल्वे स्थानकावरील गर्दीचा सर्वाधिक फायदा हा रेल्वे कॅन्टीनला होत आहे. गरमीने वैतागलेले तहानेने व्याकुळ झालेले हजारो प्रवासी, ठाणे रेल्वे स्थानकावर फ्लॅटफॉर्मवरील रेल्वे कँटीन वर पाणी बॉटल साथीफेऱ्या मारत होते. ठाणे रेल्वे स्थानकावर एकही रेल्वे कॅन्टीन वर पाणी बॉटल प्रवाशांना उपलब्ध होत नसल्याने प्रवासी पुरते वैतागलेले होते. रेल्वे कॅन्टीनवर असलेल्या वेंडर लोकांकडून प्रवाशांना उलट उत्तरे मिळत होती 'पाणी बॉटल नही हे आप कोल्ड्रिंग्स लिजिए' अशी संतापजनक उत्तरे प्रवाशांना मिळत होती. मात्र कॅन्टीनवर विक्रीसाठी असलेले थंड पेय हे एखाद्या लोकल कंपनीचे असल्याने व तेही कमी थंड असल्याने प्रवासी थंड पेय घेण्यास काही प्रवासी टाळाटाळ करीत होते.तर काही प्रवासी नाईलाजास्तव घेत होते.परंतु अप्रमाणित असलेले थंड पेय पिणे हे जरी घातक असले तरी तहानेने व्याकुळ झालेले प्रवासी आपली तहान भागविण्यासाठी थंड पेय विकत घेत होते.
परंतु एका वेळी तेही सर्वच कॅन्टीन ला पानी बॉटल मिळत नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत असून विक्री कंपनी,रेल्वे प्रशासन व रेल्वे कॅन्टीन चे ठेकेदार यांच्या सगनमताने रेल्वे स्थानकावरिल् कॅन्टीन वर पाणी बॉटल साठी प्रवाशा ना वेठीस धरले जात असल्याने.रेल्वे प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.. पाणी नसल्याने अनेकांना आली चक्कर.दरम्यान धावपळ करीत गाडी पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांना रेल्वे फलाटावरील कॅन्टीन वर पिण्याचे पाणीच उपलब्ध न झाल्याने अनेक महिला वृद्धांना उन्हाचा त्रास होऊन चक्कर आली. रेल्वे कॅन्टीन कर्मचारीही उद्धट... दरम्यान रेल्वे स्थानकावरील फ्लॅट फॉर्म कॅन्टीन वर पाणी उपलब्ध नसल्याने कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यांना विचारणा केली की ते कर्मचारी प्रवाशा ना समाधा कारक उत्तरे देत नाहीत उलट उतरे देऊन प्रवाशा ना मूर्ख ठरवण्याचे काम कर्मचारी करीत होते.