सर्वसामान्य नागरिक पाण्याचे बिल प्रामाणिकपणे भरत असतो. त्या मोबदल्यात त्याला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, एवढीच माफक अपेक्षा असते; पण उल्हास नदीपात्राजवळ असलेले रिसॉर्ट आणि फार्महाउसचे मालक अधिकाऱ्यांचे हात ओले करून बिनधास्त पाणीचोरी करत आहेत. या पाणीचोरीमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे.
उल्हास नदी आणि बारवी धरणावर अवलंबून असलेल्या ठाणे जिल्ह्यावर पाणीकपातीचे संकट दिवसागणिक गडद होत आहे. दिवाळीत २७ टक्के पाणीकपात लागू केली होती. आता कपात वाढवून ३० टक्के करण्यात आली आहे. धरणातील पाण्याचा साठा ज्या प्रमाणात उपलब्ध आहे, त्या प्रमाणात पाणीकपातीचा निर्णय घेतला जात आहे. प्रत्यक्षात शहराला आवश्यक असलेला पाणीसाठा नदीतून उचलला जात असला तरी, त्या पाण्याचे वितरण करणाºयांकडून पाणीचोरीला खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे पाणीकपातीचे संकट ओढावत आहे. वितरणव्यवस्थेमधील पाणीचोरी आणि धरणातून पाणी सोडल्यावर नदीपात्राजवळ असलेल्या फार्महाउस आणि रिसॉर्टच्या माध्यमातून होणाºया पाणीचोरीमुळे पाण्याची कपात करण्याची गरज भासत आहे. नदीपात्रातून पाणीचोरी रोखण्याचे कोणतेही प्रयत्न प्रशासनाच्या स्तरावर केले जात नाही. प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा फटका हा पाणीकपातीच्या स्वरूपात नागरिकांना सहन करावा लागत आहे.ठाणे जिल्ह्यावर सध्या पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याने पाणीकपात वाढवण्यात आली आहे. धरणातील पाणीसाठा आणि नदीपात्रातील पाणीसाठा यांचा ताळमेळ घालूनच ही कपात जाहीर करण्यात आली आहे. मूळात धरणातून सोडलेले पाणी आणि नागरिकांपर्यंत येणारे पाणी याचा ताळमेळ पाहता ३५ ते ४० टक्के पाणी चोरले जात असल्याचे समोर येत आहे. पाणीचोरीचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्यानेच नागरिकांवर पाणीसंकट ओढावले आहे.
वितरणव्यवस्थेतील त्रुटीचा सर्वाधिक फटका हा पाण्याला बसतो. पाण्याचे नियोजन आणि वितरण योग्य प्रकारे झाल्यास पाणीकपातीचे संकट ओढावणार नाही; मात्र पाण्याचे वितरण करणाºया पालिका आणि संस्था या वितरणव्यवस्थेत योग्य सुधारणा करत नसल्याचे दिसत आहे. पाण्याच्या वितरणव्यवस्थेसोबत उल्हास नदी आणि बारवी नदीवरील पाण्यावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. पाणीचोरी नेमकी कुठे होते, याचा आढावा घेण्यात आला.
आंध्र धरणातून वीजनिर्मिती केल्यावर भिवपुरी वीजनिर्मिती केंद्रातून पाणी थेट उल्हास नदीत सोडले जाते. या नदीपात्राला ३० किलोमीटरचे अंतर कापून बदलापूर गाठावे लागते. या ३० किमीच्या अंतरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उचलण्यात येते. शेतीवगळता अनेक कामांसाठी हे पाणी कोणतीही परवानगी न घेता उचलले जाते. त्यात अनेक फार्महाउसचाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर, अनेक रिसॉर्ट याच नदीपात्राच्या शेजारी असल्याने तेही कोणतीच परवानगी न घेता थेट पाणी उचलत आहेत.उल्हास नदीच्या पात्राशेजारी बदलापूरपर्यंत तब्बल १५० हून अधिक फार्महाउस असून, ते या नदीतून थेट पाणी उचलत आहेत. याच पात्राशेजारी आणि परिसरात १२ ते १५ रिसॉर्ट आहेत. तेही थेट पाणी उचलत आहेत.
दररोज हजारो लीटर पाणी थेट नदीपात्रातून चोरले जात आहे. एका बाजूला सामान्य नागरिक पाणी जपून वापरत असताना, दुसरीकडे सर्रास चोरी होत असूनही यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. या चोरांवर कारवाई करणार की नाही, हा खरा प्रश्न आहे.पाणीचोरीलाअधिकाºयांचे पाठबळपाणीचोरीला जीवन प्राधिकरणाचे अधिकारीदेखील जबाबदार आहेत. अनेक ठिकाणी अधिकाºयांनी बिल्डरांना चोरीचे कनेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. या प्रकरणात काही अधिकाºयांवर मध्यंतरी कारवाईही केली होती; मात्र तरीही शहरात अनेक इमारतींना चोरुन पाणीपुरवठा करणे सुरुच आहे. सामान्य नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.नदीपात्रातून थेट पाणी टँकरमध्येनदीपात्रातील फार्महाउससोबतच नदीपात्रापासून एक किलोमीटर अंतरावर असलेले फार्महाउसमालकही नदीत पंप लावून थेट पाणी उचलत आहेत. काही महाभागांनी उल्हास नदीच्या पाण्यावर टँकरने पाणीविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. नदीपात्रात पंप लावून थेट टँकर भरण्याचे काम या भागात सर्रास सुरू असते.बिल्डरांच्या बांधकामासाठी थेट पाण्याची उचलेगिरीउल्हास नदीपात्रात अनेक बांधकाम व्यावसायिकांची कामे सुरु आहेत. नदीपात्र जवळ असल्याने हे बांधकाम व्यावसायिक थेट नदीतून पाणी उचलून त्या पाण्यावर आपल्या इमारतींचे बांधकाम करत आहेत. बदलापूर येथील चौपाटी ते एरंजाडपर्यंतच्या नदीपात्रात अनेक बांधकाम व्यावसायिकांनी स्वतंत्र पंप लावून दिवसाढवळ्या पाणीचोरी सुरु केली आहे. दिवसरात्र पाण्याचे पंप सुरु राहत असल्याने हजारो लीटर पाणीचोरी अखंडपणे सुरू आहे. या सर्व गोष्टींची कल्पना पोलीस आणि पालिका प्रशासनाला असतानाही ते या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.नदीपात्रातील रिसॉर्टवर कारवाई नाहीउल्हास नदी आणि बारवी नदीपात्रात अनेक रिसॉर्ट उभारण्यात आले आहेत. या रिसॉर्टचे चालक थेट नदीतून पाणी उचलून रिसॉर्टसाठी वापरतात. त्यांच्याकडेही कुणीच लक्ष देत नाहीत. हवे तेवढे पाणी थेट उचलण्याचे काम केले जात आहे. या पाणीचोरीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हे प्रकार वाढतच आहेत. फुकट पाणी मिळत असल्याने अनेकजण नवनवीन रिसॉर्ट नदीपात्रात उभारण्याचे काम सुरु आहेत. पाणीचोरीवर तातडीने नियंत्रण न मिळवल्यास भविष्यात पाणीटंचाईचे संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.