शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सततच्या शटडाऊनमुळे मीरा भाईंदर मध्ये पाणीबाणी

By धीरज परब | Published: September 29, 2024 11:57 PM

Mira Bhayander News: मीरा भाईंदर शहराचा पाणी पुरवठा सलग दुसऱ्या आठवड्यात देखील शटडाऊन मुळे विस्कळीत झाला आहे . त्यामुळे शहरात पाणीबाणी ओढवली असून पाणी पुरवठा ६० ते ७० तासांवर गेला आहे . दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर उशिराने का होईना काही राजकारण्यांना पाणी टंचाई वरून जाग आली आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर शहराचा पाणी पुरवठा सलग दुसऱ्या आठवड्यात देखील शटडाऊन मुळे विस्कळीत झाला आहे . त्यामुळे शहरात पाणीबाणी ओढवली असून पाणी पुरवठा ६० ते ७० तासांवर गेला आहे . दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर उशिराने का होईना काही राजकारण्यांना पाणी टंचाई वरून जाग आली आहे.

मीरा भाईंदर शहराला एमआयडीसी व स्टेम प्राधिकरणा कडून पाणी पुरवठा केला जातो . तर दोन्ही प्राधिकरण हे आलटून पालटून बहुतांश दर आठवड्याला विविध कारणांनी २४ तासांचा शट डाऊन घेतला जातो . जलवाहिन्या , यंत्र व उपकरणांची दुरुस्ती आदी विविध कारणां सह पाणी कपात म्हणून पण शट डाऊन घेतला जातो . पाणी पुरवठ्याच्या ठिकाणा पासून मीरा भाईंदर हे शेवटच्या टोकाला असल्याने आधीच पाणी येण्यास विलंब लागतो . त्यातच शटडाऊन असल्यास पाणी पुरवठा २४ तासां करीत बंद राहिल्याने तो सुरळीत होण्यासाठीच ४८ लागतात.

एमआयडीसी ने २० सप्टेंबर रोजी २४ तसंच शटडाऊन घेतल्याने शहरातील पाणी सुरळीत होण्यासाठी तीन ते चार दिवस गेले . पाणी काहीसे सुरळीत होत नाही तोच २७ सप्टेंबर रोजी स्टेम प्राधिकरणाने २४ तासांचा शटडाऊन घेतला . त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा तब्बल ६० ते ७० तासांवर गेला होता . सोमवार पासून पाणी पुरवठ्याचे तास आता साधारण ४० ते ४८ तासांवर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

परंतु शटडाऊन मुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी समस्येचा सामना करावा लागला . अनेकांना बाहेरून खाजगी टँकर मागवावे लागले . काहींना तर पिण्याचे पाणी देखील विकत घ्यावे लागले . नागरिकांना होणाऱ्या पाणी समस्ये बद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत सह माजी नगरसेवक राजीव मेहरा , जुबेर इनामदार आदींनी पालिकेत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांची भेट घेऊन पाणी  टंचाईचा निषेध केला . 

मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने पालिकेत हांडा मोर्चा काढून निषेध केला . यावेळी पोलिसांच्या समक्षच राणे यांनी नानेगावकर यांना शाहीची बाटली काढून ती टाकण्याची धमकी दिली . शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दिनेश नलावडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त संजय काटकर यांना निवेदन दिले .  नागरिकांना दोन - दोन दिवस पाणी मिळत नसल्याचा संताप व्यक्त करत आयुक्तांनी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली . 

पाणी टंचाईला बहुतांश राजकारणी , तत्कालीन नगरसेवक आणि महापालिका जबाबदार कायद्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक असून पावसाचे पाणी जमिनीत मुरवून ते पाणी वापरल्यास शहरात पाणी टंचाई भेडसावणार नाही असे लोकमतने वेळोवेळी वृत्त दिले आहे . यंदा देखील मुसळधार पाऊस पडला पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणाच कार्यंवाहीत नसल्याने व ती योजना प्रभावी राबवली जात नसल्याने पावसाचे पाणी वाया गेले . रेन वॉटर मुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून नागरिकांना शौचालयासह , धुणीभांडी आदि कामांसाठी पाणी सहज उपलब्ध होऊ शकते . परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते . सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी सुद्धा वापरात आणणे बंधनकारक असताना त्याकडे देखील महापालिका ,व बहुतांश राजकारणी , टंकटलाईन नगरसेवक हे दुर्लक्ष करत आहेत . 

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातMira Bhayanderमीरा-भाईंदर