उमेश जाधव, टिटवाळाकल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील काळू, भातसा, उल्हास व बारवी या चार नद्यांवर गाव तेथे पाणीयोजना असतानाही तालुका पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने चक्क ४६ गावे आणि ८५ पाड्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी या वर्षी २ कोटी १८ लाख रु पयांचा टंचाई आराखडा पाणीपुरवठा विभागाला नुकताच सादर केला आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी लाखो रु पये खर्च करूनही ग्रामस्थ आजही पिण्याच्या पाण्यासाठी तडफडत आहेत, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.काळू, उल्हास, भातसा व बारवी या चार नद्या तालुक्यातून वाहत आहेत. ४५ गावे नदीपासून हाकेच्या अंतरावर आहेत, तर २० पाडे नदीजवळ आहेत. मात्र, टंचाई आराखड्यात पाणीयोजना मंजूर झालेल्या गावांसाठी योजना दुरु स्तीकरिता निधीची तरतूद केली आहे. हा तालुका टँकरमुक्त असताना भ्रष्ट अधिकाऱ्यांनी टंचाईच्या नावाने चांगभलं करण्यासाठी सहा गावे आणि तीन वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ३ लाख रु पयांची तरतूद केली आहे. तसेच १० गावे आणि आठ पाड्यांमधील पाणीयोजना दुरुस्तीसाठी एक कोटी ४७ लाख रुपयांची व्यवस्था केली आहे. तर, बोअरवेल खोदण्यासाठी २६ गावे आणि ७४ पाड्यांसाठी २७ लाख रु पये मंजूर केले जाणार आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी २७ बोअरवेल खोदण्यात आल्या होत्या, त्यापैकी अवघ्या दोन बोअरवेलना पाणी लागले. तेही मे महिन्यानंतर आटले. त्यामुळे शेकडो बोअरवेल आज बंद असताना नियोजन न करताच पाणीपुरवठा विभागाने तयार केलेला हा टंचाई आराखडा फसवा आहे, असा आरोप ग्रामस्थांचा आहे.
कल्याणसाठी पाणीटंचाई आराखडा
By admin | Published: April 11, 2016 1:22 AM