शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

कोकणात पन्नासहून अधिक ठिकाणी लवकरच वॉटर स्पोर्ट्सचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 5:00 AM

मुंबईतील वर्सोवा, मनोरी जुहू-तारा बीचसह ठाण्यातील उत्तन, मोठागाव रेतीबंदर, नागलाबंदर, वसई, डहाणू, तारापूर, रायगडमधील आक्षी, रेवदंडा, श्रीवर्धन अशा कोकणातील सहा जिल्ह्यांतील पन्नासहून अधिक ठिकाणी लवकरच वॉटर स्पोर्ट्सची धूम पाहायला मिळणार आहे.

- नारायण जाधवठाणे  - मुंबईतील वर्सोवा, मनोरी जुहू-तारा बीचसह ठाण्यातील उत्तन, मोठागाव रेतीबंदर, नागलाबंदर, वसई, डहाणू, तारापूर, रायगडमधील आक्षी, रेवदंडा, श्रीवर्धन अशा कोकणातील सहा जिल्ह्यांतील पन्नासहून अधिक ठिकाणी लवकरच वॉटर स्पोर्ट्सची धूम पाहायला मिळणार आहे. यात जेटकिंगसह पॅरासेलिंग, स्कायकिंग, बनाना राइड, वॉटर रॉफिटंगचा थरार अनुभवायला मिळणार आहे. यामुळे वॉटर रॉफिटंगसाठी केरळ, गोवा किंवा काश्मिरी-हिमाचलमधील नद्यांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने यासाठी पुढाकार घेतला असून इच्छुकांकडून सहा जिल्ह्यांतील खाडी व समुद्रकिनाऱ्यावरील ठिकाणांची यादी देऊन त्यासाठी प्रस्ताव मागवले असल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे महापालिकेने तर गायमुख येथे त्यादृष्टीने तयारीही चालवली आहे.कोकणातील पर्यटनवाढीसह स्थानिकांना रोजगार मिळावा, पर्यटकांना बीचमध्ये डुंबण्यासह करमणुकीसह वॉटर स्पोर्ट्सचा थरार अनुभवता यावा, हा मेरीटाइम बोर्डाचा यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्र जलक्रीडा धोरण-२०१५ नुसार मेरीटाइम बोर्डाने यापूर्वी काही ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स सुरूही केले आहे. त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून जलक्रीडा प्रकल्प राबवण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीलाच इच्छुकांकडून बोर्डाने प्रस्ताव मागवले आहेत. तज्ज्ञ मनुष्यबळ, जलक्रीडांसाठी आवश्यक असलेली साधनसामग्रीची उपलब्धता, तांत्रिक कर्मचारी, आर्थिक क्षमता या बाबी तपासून मेरीटाइम बोर्ड इच्छुक संस्थांना त्यात्या ठिकाणी आवश्यक ते सहकार्य करून परवानगी देणार असल्याचे ही सूत्रे म्हणाली.हे असणार वॉटर स्पोर्ट्सजेटकिंगसह पॅरासेलिंग, स्कायकिंग, बनाना राइड, वॉटर रॉफिटंग, पॉवर बोट, बेअरफूट स्किंग, विंड सफरिंग, स्क्रूफिंग, केबल स्किलिंग, वेक बोर्डिंग, कॅनॉर्इंग, डिंग्घी सेलिंग, स्काइट सफरिंग, भरतीच्या लाटांवर आरूढ होऊन धाडसाचा प्रत्यय आणून देणारी स्किम बोर्डिंग यांचा प्रामुख्याने समावेश राहणार आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी असलेली जागेची उपलब्धता, पाण्याच्या स्वच्छतेची पातळी, खोली यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी निरनिराळ्या जलक्रीडांना परवानगी देणार असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.येथे पाहायला मिळणार वॉटर स्पोर्ट्सची धूममुंबई उपनगरे- मार्वे, मनोरी, वर्सोवा, जुहूतारा बीच, ठाणे- उत्तन, मोठागाव रेतीबंदर, गायमुख, नागलाबंदर, भार्इंदर पूर्व-पश्चिम जेट्टी सुरूची बाग, घोडबंदर, नागलाबंदर, पालघर- डहाणू, तारापूर, सातपाटी, केळवा, माहीम, अर्नाळा, रायगड- मोरा, नागाव, पिरवाडी, आक्षी, रेवदंडा, पालव, थेरांडा, मुरूड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर. रत्नागिरी- आरेवारे, भाट्ये, गुहागर, मालगुंंड, गणपतीपुळे, कर्दे, तिवरी, नेवरे, भातगाव, वेळणेश्वर, दाभोळ, अंजर्ला, लाडघर, हर्णे, केळशी, बाणकोट, सुवर्णदुर्ग, जैतापूर सिंधुदुर्ग- किरपाणी, रेडी, वेंगुर्ला, निवती, मालवण, आचरा, देवगड, विजयदुर्ग

टॅग्स :konkanकोकणnewsबातम्या