शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आठ दिवसांपासून ठाण्यात पाणीबाणी; सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी शुक्रवार उजाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 5:15 AM

शहराला आजघडीला ४८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे.

ठाणे : योग्य नियोजन केले असले तरी ठाण्यावर मागील आठ दिवसांपासून पाणीसंकट ओढवल्याची बाब समोर आली आहे. जुन्या ठाण्यातील प्रमुख भागांसह घोडबंदर परिसरातही आठ दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. काही भागांमध्ये तर पाण्याचे वेळापत्रकच बिघडले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १३०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला द्रुतगती महामार्गाचे काम सुरू असताना धक्का लागून गळती सुरू झाल्यानेच ही समस्या ओढवल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. तिची दुरुस्ती केल्यानंतर शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असेही स्पष्ट केले आहे.शहराला आजघडीला ४८५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. मागील वर्षी पाऊस चांगला झाल्याने पाणीकपातीचे संकट तूर्तास ओढवलेले नाही. मात्र, असे असले तरी दुरुस्तीसाठी काही महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. असे असतानाच आता आठ दिवसांपासून अनेक भागांना पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. शहरातील नौपाडा, चरई, सिद्धेश्वर टाकीवरून ज्याज्या भागांना पाणीपुरवठा होतो, तेते सर्व भाग तसेच इतर भागांतही पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. परंतु, काही भागांना रात्रीअपरात्री, तर काही भागांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.घोडबंदरवासीयांचे नियोजन कोलमडलेदुसरीकडे घोडबंदर भागातील ब्रह्मांड, वाघबीळ, आझादनगर, पातलीपाडा, डोंगरीपाडा आदी भागांनादेखील या पाणीबाणीचा फटका बसत आहे. रात्रीअपरात्री पाणी येत असल्याने नागरिकांना रात्रीचे जागरण करून ते भरावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे सकाळी कामाला जाण्याचे नियोजनही कोलमडले आहे.महामार्गाच्या कामामुळे जलवाहिनीला गळतीयासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना छेडले असता, मागील आठ दिवसांपासून ही परिस्थिती ठाण्यातील अनेक भागांत असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाºया १३०० मिमी व्यासाच्या पिसे धरणावरून येणाºया जलवाहिनीला रांजनोलीनाक्याजवळ मुख्य द्रुतगती महामार्गाचे काम सुरू असताना धक्का लागून गळती सुरू झाली आहे. ही जलवाहिनी रस्त्याच्या खालून जात असल्याने तिची माहिती तत्काळ समजू शकली नाही. त्यानंतर, डिटेक्टर आणून या जलवाहिनीवर कुठे गळती आहे, याची माहिती घेतली. त्यानुसार, आता तिच्या दुरुस्तीचे काम बुधवारी हाती घेतले आहे. ही दुरुस्ती झाल्यानंतर गुरुवारी कमी दाबाने शहराला पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, शुक्रवारपासून तो सुरळीत होईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :thaneठाणे