शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या २४ गावाना केवळ एका टँकरने पाणी पुरवठा; सांगलीच्या टँकर चालकांचा यंदा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 7:21 PM

टंचाईवर मात करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग सतर्क करण्यात आल्याचे सुतोवाच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवके भीमनवार (सीईओ) यांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. मात्र सदस्यांनी त्यावर समस्यांचा बडीमार करून त्यांचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्न केला

ठळक मुद्देमुंबई, ठाण्यासह जिल्ह्यात सर्वच शहराना पाणी पुरवठा करणा-या शहापूर तालुक्यातील गावांमध्ये पुन्हा तीव्र पाणी टंचाई समस्यांचा बडीमार करून त्यांचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्नसांगलीच्या टँकरचालकाना आजपर्यंतही बील मिळाले नसल्याने ते यंदा पाणी पुरवठा करण्यास नकार

ठाणे: यदांच्या कडकडीत उन्हाळ्यात शहापूर तालुक्यात पाणी टंचाईने पुन्हा डोकेवर काढले. तालुक्यात ठिकठिकाणच्या २४ गावांमध्ये सध्या तीव्र पाणी समस्या सुरू आहे. त्या गावाना केवळ एक टॅकर पाणी पुरवठा करीत आहे. मागील वर्षाच्या टंचाईत पाणी पुरवठा करणाऱ्या सांगलीच्या टँकरचालकाना आजपर्यंतही बील मिळाले नसल्याने ते यंदा पाणी पुरवठा करण्यास नकार देत असल्याचे वास्तव शहापूर येथील जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा मेंगाळ यांनी उघड केले.मुंबई, ठाण्यासह जिल्ह्यात सर्वच शहराना पाणी पुरवठा करणा-या शहापूर तालुक्यातील गावांमध्ये पुन्हा तीव्र पाणी टंचाई सुरू झाली. या टंचाईवर मात करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग सतर्क करण्यात आल्याचे सुतोवाच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवके भीमनवार (सीईओ) यांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. मात्र सदस्यांनी त्यावर समस्यांचा बडीमार करून त्यांचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्न केला. टंचाई सुरू होताच टँकरची मागणी करण्याचे आावहन केले. परंतु सतत फे-या मारूनही टंकर मिळत नसल्याचे वास्तव मेंगाळ यांनी उघड केले. एवढेच नव्हे तर बोरिंगचा पाँईट देण्यासाठी देखील अभियंते फिरकत नसल्याची खंत मुरबाडचे सुभाष घरत यांनी व्यक्त केली. टंचाई संपेपर्यंत टँकर हो म्हणणारे अधिकारी शेवटी टँकर सुरू करता येणार नसल्याचे सांगून मोकळे होत असल्याचा अनुभवही घरत यांनी सीईओना ऐकावला.खर्डीजवळील शिवळ, अजरूप, टेंभ्याचा पाडा, आंब्याचा पाडा आदी परिसरातील नागरिक विहिरीतील थेंबथेब पाणी गोळा करीत आहेत. तर काही रहिवाशी हंडे,ड्रम, टाक्या लोकलमध्ये टाकून कसा-याहून पाणी आणत असल्याचे चंदे या सदस्याने सांगितले. तर सपाटपाडा, हिव, अनदाड, कासगाव, धसई, सरड्याचा पाडा या गावांमध्ये देखील तीव्र पाणी टंचाई सुरू असल्याचे वंदना भांडे यांनी सीईओंच्या निदर्शनात आणून देत जिल्ह्यातील पाणी टंचाई उग्र रूप धारण करीत असल्याचे या सदस्यांकडून ऐकायला मिळाले. यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून काय हालचाली होणार याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद