अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : महाराष्ट्र औद्यगिक विकास महामंडळाचे पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहीनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे १८ एप्रिल रात्री १२ ते शुक्रवार १९ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, वागळे इस्टेट आदी परिसरांचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवला जाणार आहे.
यापूर्वी हे दुरुस्तीचे काम ११ एप्रिल रोजी हाती घेण्यात येणार होते. परंतु काही तांत्रिक कारणामुळे ते काम हाती घेण्यात आले नाही. आता तेच काम येत्या १८ एप्रिल रोजी हाती घेतले जाणार असल्याने हा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या कालावधीत कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच पाणी पुरवठा सुर झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.