उल्हासनगर : शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असतानाच २० सेक्शन विभागात पाणी टँंकरच्या वाटपावरून हाणामारी झाली. यात टँंकरचालक राम गायकवाड जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरातील सेक्शन-२० येथे गायकवाड व सहायक कर्मचारी लबाना टँंकर घेऊन गेले होते. चालक-वाहक एकाच ठिकाणी पाणी देत असल्याचा राग बंटी, नितीन, विकी व त्यांच्या साथीदाराला आला. त्यांनी याबाबत गायकवाड यांच्याशी हुज्जत घातली. रागाच्याभरात चौघांनी गायकवाड याला मारहाण केली. लबाना याने मध्यवर्ती पोलिस ठाण्याला मारहाणीची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लबाना यांच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. नगरसेवकांतही हाणामारी पाणीटंचाईवरून गेल्या महिन्यात भाजपाच्या नगरसेविका नीना नाथानी यांचे पती प्रकाश यांना भाजपाच्या नगरसेविका मिना कौर लबाना यांचा मुलगा बॉक्सर याने मारहाण केली. तर दुसऱ्या घटनेत जलवाहिनी टाकण्यावरून मनसे नगरसेवक रवी दवणे व राष्ट्रवादीच्या नगरसेविका शुभांगी बहेनवाल यांचे पती मनोहर यांच्यात हाणामारी झाली होती. (प्रतिनिधी)कमी दाबाने पाणीपुरवठा पालकमंत्र्याच्या मध्यस्थीमुळे एमआयडीसीकडून पालिकेला १८ एमएलडी पाणी वाढविल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात एमआयडीसी कडून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे वाढीव पाण्याचा फायदा होत नसल्याची प्रतिक्रीया पालिका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
पाणीटँंकर चालकाला उल्हासनगरात मारहाण
By admin | Published: May 02, 2016 1:15 AM