ठाणे : पाणीनियोजन आणि बचतीबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने १६ ते २२ मार्चदरम्यान राज्यभर जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या जलकलशाचे गुरुवार, १६ मार्चला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते पूजन होणार आहे. या सप्ताहाच्या काळात सर्व तालुक्यांमधून जलरथदेखील धावणार असून २० मार्चला घाणेकर नाट्यगृहाजवळून जलदौडीचे आयोजन केले आहे. जलसंपदा विभागामार्फत संपूर्ण राज्यभर जलसप्ताह राबवण्यात येत असला तरी या कार्यक्र मात शासनाच्या सर्व विभागांना सामावून घेण्यात येणार आहे. यासाठी आठवडाभर विविध कार्यक्र म होणार आहेत. पाण्याविषयी कथाकथन, कवितावाचन, लघुनाट्य, जल साहित्य संमेलन व सांस्कृतिक कार्यक्र मांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जलजागृती केली जाणार आहे. पाणी, पाण्याची गुणवत्ता, स्थानिक सिंचन प्रकल्प, सिंचन व्यवस्थापन यंत्रणा व त्यांची कार्यपद्धती याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे. याच निमित्ताने शाळा, महाविद्यालयांत विविध स्पर्धा व कार्यक्र म आयोजिण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गावोगावी पाण्याचे महत्त्व पटवून देणारे मेळावे, कीर्तन व पथनाट्येदेखील आयोजित केली जातील.जलजागृती सप्ताहाच्या कालावधीत जिल्ह्याच्या स्तरावर सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्येही पाणीबचतीचे कार्यक्रम होणार आहे. कृषी, जलसंपदा, शालेय शिक्षण, पाणीपुरवठा, पर्यावरण, हे देखील कार्यक्रमांचेही आयोजन करणार आहेत. (प्रतिनिधी)
पाणीबचत सप्ताहास आजपासून सुरुवात
By admin | Published: March 16, 2017 2:53 AM