शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

रास्ता, पानी नहीं, कैसे जिऐंगे ?

By admin | Published: May 06, 2017 5:46 AM

कोट्यवधींचा निधी खर्च करूनही भिवंडीतील रस्ते व गटारांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांत वाहन फसल्याने रस्त्यावरच प्रसूती

रोहिदास पाटील/लोकमत न्यूज नेटवर्कअनगाव : कोट्यवधींचा निधी खर्च करूनही भिवंडीतील रस्ते व गटारांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांत वाहन फसल्याने रस्त्यावरच प्रसूती झाल्याची घटना शहरातील शांतीनगरात घडल्याने मुस्लिम महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना संताप व्यक्त केला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता. सहा महिन्यांतच रस्ते खराब होत असतील, तर नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्नही या महिलांनी विचारला आहे. शहरातील गैबीनगर, शांतीनगर, कोंबडपाडा हाबहुतांश मुस्लिमबहुल परिसर म्हणजे समस्यांचे आगार झाले आहे. भिवंडीत पाण्याची समस्या गंभीर आहे. अण्णा भाऊ साठेनगरात १५ दिवसांनी पाणी येते. वितरणामधील दोषामुळे योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. पाइपलाइनच्या ठिकाणी चाळण झाली आहे. त्यामुळे त्यातसांडपाणी शिरत असल्याने आमच्या नशिबी हे दूषित पाणी वापरण्याशिवाय गत्यंतर नाही, असे या महिलांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छता अभियानासाठी आवाहन करत असताना शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. नाकांवर रूमाल ठेवल्याशिवाय चालताच येत नाही, असे या महिला म्हणाल्या. स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे नुसते घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असे या महिलांनी आवर्जून सांगितले. पालिकेने नालेसफाईला सुरुवात केलेली नाही. शहरात १५ आरोग्य केंदे्र आहेत. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात. वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी राहतही नाहीत. परिणामी, रात्रीअपरात्री रुग्णाला आणले तर योग्य सुविधा मिळत नाहीत. याविषयी अनेक तक्रारी करूनही आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही.ट्रिपल तलाक पद्धत बंद व्हायला हवीट्रिपल तलाकमहिलांच्यादृष्टीने अन्यायकारक आहे. एखादा पुरु ष आपल्या पहिल्या पत्नीशी तलाक घेतो आणि संसारात विघ्न आणतो. तो दुसऱ्या स्त्रीसोबत सुखाने संसार करणार नाही. त्यामुळे तोंडी तलाक प्रथा बंद करणे आवश्यक आहे. मुस्लिम समाजाच्या हिताचे आहे, असे परखड मत सामाजिक कार्यकर्त्या प्रवीण फारूक कणूल यांनी व्यक्त केले. स्थानिक समस्येवरही त्यांनी जोरदार टीकास्त्र केले. रस्त्यात वाहन अडकल्यामुळे महिलेला रु ग्णालयात वेळेवर पोहोचता आले नाही. शांतीनगरमध्ये महिलेची प्रसूती रस्त्यावरच झाली. यासारखा दुसरा दुर्दैवी प्रकार असूच शकत नाही. प्रशासन आणि नगरसेवक याकडे लक्ष देणार कधी, असे त्यांनी विचारले.शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कोट्यवधींचा खर्च करूनही त्यांची स्थिती सुधारलेली नाही. पाणी, आरोग्य, गटारांचा प्रश्न सुटलेला नाही. पाण्यासाठी महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.- नरसीन खान, पिराणीपाडा रस्ते, पाणी, स्वच्छता हे प्रश्न गंभीर आहेत. पाण्यासाठी महिलांना त्रास सहन करावा लागतो. नगरसेवक, पालिकेने याकडे लक्ष देत त्या सोडवणे आवश्यक आहे.- वाजेदा तबस्सुम मोमीन, शांतीनगरपालिका प्रशासनाने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे बंधनकारक आहे. मात्र, ती आपली जबाबदारी नाही, अशा पद्धतीने वागत आहेत, हे चुकीचे आहे. नागरी सुविधांसाठी नागरिकांनीच आवाज उठवायला हवा. - जोहरांनी मोईद्दीन शेख, कोंबडपाडा