शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

'तुम्ही निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे आम्ही इथे'; छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 9:31 AM

मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली.

Chhagan Bhujbal ( Marathi News ) :'आम्ही इथे येण्यासाठी तुम्हीच परिस्थिती निर्माण केली होती, तुम्ही आमदारांच्या सहावेळा सह्या घेतल्या. सर्वांसमोर हे असं करायचं आहे म्हणून चर्चा केली. पण, ऐनवेळेला तुम्ही हो म्हणायचं आणि माग सरायचं. आम्ही इथे येण्यासाठी तुम्ही परिस्थिती निर्माण केली, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर केली.  काल ठाण्यात राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचा मेळावा झाला. यावेळी बोलताना भुजबळ यांनी शरद पवारांवर आरोप करत टीका केली. 

"आपल्या पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे, पक्षातील सगळ्यांनी एकमेकांना मदत करा. आपआपसात पाय खेचण्याचे काम होऊ नये. आम्ही आमची विचारधारा बदलली नाही. विचारधारा तिच शाहू, फुले आंबडकरांची आहे, अजितदादा सगळ्यांना बरोबर घेऊन काम करत आहेत, असंही भुजबळ म्हणाले. आपला पक्ष तोच आहे, ध्येय तेच आहे, लोक म्हणतील हा पक्ष नवीन आहे पण आपला पक्ष तोच जुना आहे. 

विशेष लेख: राहुल यांच्या यात्रेआधीच 'इंडिया'त धुसफुस? एकजुटीऐवजी फाटाफुटीचीच चिन्हे

मुंबईत राष्ट्रवादीचा खासदार व्हायला पाहिजे

"राष्ट्रवादी पक्षासाठी प्रफुल्ल पटेल यांनीही कष्ट घेतले आहेत, त्यामुळे पक्ष आपल्यासोबतच राहणार आहे. निकाल आपल्या बाजूनेच लागेल. मुंबईत आपल्या पक्षाचा एक तरी खासदार झाला पाहिजे, आपण आता आपला खासदार निवडून आणणार आहोत. यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आपण काम करतोय हे लोकांना कळलं पाहिजे. लहान लहान काम आपण केली पाहिजे, लोकांना आपलंस केले पाहिजे, असा सल्लाही छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.   

छगन भुजबळ म्हणाले, पलिकडच्या गटातील लोक ज्यावेळी संतापतील त्यावेळी समजून घ्या आपल्या सगळ्यांची शक्ती वाढत आहे. म्हणून ते आपल्यावर टीका करत आहेत. येऊन जाऊन सारख अजित पवार, छगन भुजबळ विसरा आता आम्हाला तुम्ही. नवीन तुमच तुम्ही काम उभं करा, आम्ही आमच काम उभं करतो, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. आम्ही एका परिस्थितीमुळे इकडे आलो, ती परिस्थिती तुम्हीच निर्माण केली. तुम्ही आमदारांच्या सहावेळा सह्या घेतल्या. सर्वांसमोर हे असं करायचं आहे म्हणून चर्चा केली. पण, ऐनवेळेला तुम्ही हो म्हणायचं आणि माग सरायचं. सारख तळ्यात, मळ्यात करायचं. मग आम्ही एकदा ठरवलं जायचं. आम्ही आमची शक्ती वाढवणार, ती वाढली आहे, मागे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अजितदादांना मोठं यश मिळालं आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार