डोंबिवली : रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाले बसू नये, या उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता कल्याण- href='http://www.lokmat.com/topics/dombivali/'>डोंबिवली महापालिकेने कंबर कसली असून गेला आठवडाभर डॉ. राथ रोड, पाटकर रोड, उर्सेकरवाडी आदी परिसरांतील शेकडो फेरीवाल्यांना त्यांची पथारी मांडता आलेली नाही. तब्बल २५ फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल केल्यामुळे फेरीवाला संघटना अस्वस्थ आहेत.‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी कारवाई करण्यासाठी पथक नेमले असून कोणत्याही स्थितीत फेरीवाले स्टेशन परिसरात बसता कामा नयेत, यासाठी कडक कारवाई सुरू ठेवली आहे. जो फेरीवाला दादागिरी करेल, त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात येत असून आतापर्यंत सहा महिन्यांत २५ फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. १५ आॅगस्ट रोजी संघटनांनी निषेध आंदोलन केले होते. परंतु, त्या आंदोलनाचा महापालिकेवर कोणताही परिणाम झाला नाही. आमची कारवाई सुरूच राहणार असल्याचे कुमावत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. फेरीवाला संघटनांनी निषेध आंदोलन केले. त्यांनी पोलिसांना त्यांच्या मागण्यांचे पत्र दिले. तसेच दोन वेळा आयुक्तांसमवेत बैठक झाली. आम्हाला पर्यायी जागा दिलेली नाही. त्यामुळे आम्ही जायचे तरी कुठे, असा सवाल कष्टकरी हॉकर्स, फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी केला. त्यामुळे जोपर्यंत पर्यायी जागा मिळत नाही, तोपर्यंत आहे तेथेच व्यवसाय करणार, असा पवित्रा त्यांनी घेतला. फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे पदपथ मोकळे झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आठवडाभर फेरीवाले हद्दपार; केडीएमसीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 3:47 AM