कल्याण : शहरातील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या रस्त्याच्या रुंदीकरणानंतर फेरीवाले आणि व्यापारी यांनी पदपथावर अतिक्रमण केल्यासंदर्भातील बातमी मंगळवारी ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये ‘व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा का?’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या केडीएमसी प्रशासनाने पदपथावरील अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई सुरू केली.
पहिल्या टप्प्यात दुर्गामाता चौक ते महमदअली चौक रस्त्यावरील पदपथावरील अतिक्रमणे, वाढीव बांधकामे पाच जेसीबींद्वारे तोडण्यात आली. यावेळी ६८ बेकायदा शेड, नऊ हातगाड्या आणि सहा टपऱ्यांवर हातोडा मारण्यात आला. या कारवाईच्या वेळी केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके आणि अतिक्र माणविरोधी विभागाचे उपायुक्त सुनील जोशी उपस्थित होते. या कारवाईत रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या गल्लीतील अतिक्र मणही हटविण्यात आले. दुसरीकडे सोमवारच्या साप्ताहिक आढावा बैठकीत आयुक्तांनी सर्व सामान्य नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मोकळे करणे आवश्यक असल्याने, पदपथावरील अतिक्र मणे हटवण्याचे आदेश सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाºयांना दिले आहेत. त्यानुसार मंगळवारपासून या कारवाईला ‘क’ प्रभाग क्षेत्रातून सुरुवात केल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तर दुसºया टप्प्यात बेकायदा गॅरेज, टपºया आदींवर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, मंगळवारी कारवाईत १२० कामगार, ५० पोलीस सहभागी झाले होते. तर प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रकाश ढोले, अतिक्र मण विभागाचे सहायक आयुक्त सुहास गुप्ते, अधीक्षक किशोर खुताडे हेदेखील उपस्थित होते. पदपथावर अतिक्रमण केलेल्या दुकानदारांनी स्वत: वाढीव बांधकाम काढावे, अन्यथा, कारवाई करण्यात येईल, असे बोडके यांनी बजावले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यास ‘केडीएमसी’च्या कारवाईचा फटकाकेडीएमसीने अतिक्रमणांवर केलेल्या कारवाईचा फटका बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे समाजिक कार्यकर्ते दिलावर शेख (५०) यांना बसला आहे. कारवाई पथकाने त्यांची टपरी हटविण्याचा इशारा दिला आहे. यावेळी पथकाने त्यांच्याशी हुज्जत घातल्याने त्यांनी न्यायासाठी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. मात्र, त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही.दिलावर हे आईसह रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या परिसरात राहत होते. लहानपणापासून ते कष्टाची कामे करत आहेत. जशी समज आली तेव्हापासून ते बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहे. या त्यांच्या समाजिक कार्याची दखल विविध पोलीस ठाण्यांनी घेतली आहे. दिलावर यांना बसण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी स्वखर्चातून ७० हजार रुपयांची टपरी बनवून घेतली. ही टपरी १० वर्षांपासून महात्मा फुले पुतळ्याच्या समोरच्या रस्त्यालगत पदपथावर आहे. तेथे बसून ते समाज कार्य करतात.महापालिकेच्या कारवाई पथकाने त्यांना टपरी हटवण्यास सांगितले आहे. माझा कोणताही नफा कमवण्याचा उद्देश नाही. महापालिकेने माझ्या सामाजिक कार्याची दखल घ्यावी, अशी मागणी करत न्याय देण्याची मागणी केली आहे.पूर्वकल्पना द्यावी : पदपथावरील कारवाईला विरोध नाही, पण प्रशासनाने कारवाईपूर्वी नोटीस किंवा तोंडी माहिती देणे आवश्यक होते, असे मत सभागृहनेते श्रेयस समेळ यांनी व्यक्त केले. बेकायदा बांधकामे, बेकायदा रिक्षास्टॅण्ड, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, बेकायदा नळजोडण्या आम्ही वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यावरही कारवाई करावी, असे समेळ म्हणाले.अधिकाºयांवर आरोपडोंबिवली : महापालिकेचे ग प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत हे पदपथ व्यापणाºया उर्सेकर वाडीमधील गाळेधारकांवर कारवाई करीत नाही. तेथील व्यापाºयांसमवेत त्यांचे साटेलोटे आहे का, असा आरोप कष्टकरी हॉकर्स, भाजीवाला युनियनचे बबन कांबळे यांनी केला आहे.ग प्रभागात विविध ठिकाणी गाळेधारकांकडून पदपथासह बहुतांश जागा व्यापली आहे. यासंदर्भात कुमावत यांच्यासह त्यांच्या पथकालाही सूचित केले; परंतु स्थिती जैसे थे असल्याचा आरोप कांबळे यांनी केला.महापालिकेची कारवाई पारदर्शी पद्धतीने सुरू आहे. कर्मचाºयांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा दावा कुमावत यांनी केला.