शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला लवकरच मुहूर्त? कचऱ्यापासून होणार वीजनिर्मित्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 4:54 AM

वीजनिर्मिती प्रकल्पाच्या निविदेला प्रतिसाद : कचऱ्यावर प्रक्रियेसाठी कंत्राटदाराला हवा प्रति टन ७११ रुपये दर

मुरलीधर भवार

कल्याण : केडीएमसीने वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पासाठी तिसºयांदा मागवलेल्या निविदेस अखेर प्रतिसाद मिळाला आहे. इंडिया पॉवर आणि हिताची इंडिया या जॉइंट व्हेंचर कंपनीची एकमेव निविदा आली आहे. या कंपनीने कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी प्रति टन ७११ रुपये दर नमूद केला आहे. या दराबाबत सल्लागार कंपनीशी विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

वेस्ट टू एनर्जी हा कचऱ्यापासून वीज तयार करण्याचा पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २००८ पासून महापालिका त्यासाठी निविदा मागवत आहे. त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने हा प्रकल्प रखडला होता. २०१७-१८मध्ये या प्रकल्पासाठी दोनदा निविदा मागवण्यात आल्या. तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू हे त्यासाठी आग्रही होते. तेव्हाही प्रतिसाद मिळाला नाही. तिसºयांदा निविदा मागवली होती. केडीएमसीच्या या प्रकल्पामध्ये पॉवर इंडिया आणि हिताची इंडिया या जॉइंट व्हेंचर कंपनीने स्वारस्य दाखवले आहे. या कंपनीची निविदा महापालिकेने उघडली आहे. या निविदेत कचºयावर प्रक्रियेसाठी प्रतिटन ७११ रुपये दर नमूद केला आहे. हा दर मान्य केल्यास ५०० टन कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी दिवसाला तीन लाख ५५ हजार रुपये खर्च येऊ येईल. तर महिन्याला हा खर्च एक कोटी सहा लाख आणि वर्षाला १२ कोटी ७९ लाखांवर जाईल.उंबर्डे येथे उभारल्या जाणाºया या प्रकल्पातून दिवसाला ५०० टन कचºयापासून आठ मेगावॉट वीजनिर्मिती होऊ शकते. हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारला जाणार असून निविदाधारक कंपनीला २२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.जॉइंट व्हेंचरनुसार इंडिया पॉवर व हिताची इंडिया या कंपन्या अनुक्रमे ७४ टक्के आणि २६ टक्के खर्च उचलणार आहेत. या कंपनीचा कचºयापासून वीजनिर्मिती प्रकल्प मध्य प्रदेशातील जबलपूर येथेही सुरूआहे.जगभरात ६०० ठिकाणी असे प्रकल्प या कंपनीने उभारेले आहेत. नागपूर येथेही हीच कंपनी प्रकल्प राबवणार असून अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.उंबर्डे होणार वेस्ट प्रोसेसिंग केंद्र, ‘स्वच्छ भारत’मधील ६० कोटी घनकचºयावर खर्चउंबर्डे येथे ३०० टन कचºयावर प्रक्रिया करून वेस्ट टू कंपोस्ट तयार केले जाणार आहे. त्यासाठी सौराष्टÑ कंपनीला निविदा मंजूर झाली आहे. हे काम सुरू झाले आहे. याच ठिकाणी एक एकर जागेवर १३ टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प सुरू झाला आहे. वेस्ट टू कंपोस्ट, बायोगॅस आणि जैववैद्यकीय प्रकल्पाला पर्यावरण खात्याकडून ना हरकत दाखला मिळाला आहे. जवळच १० एकर जागेवर वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने उंबर्डे हे वेस्ट प्रोसेसिंग केंद्र बनणार आहे. जैव वैद्यकीय कचरा प्रकल्पाच्या उभारणीवर सात कोटींचा खर्च झाला आहे. वेस्ट टू कंपोस्ट, आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करणे, बारावे भरावभूमी क्षेत्र विकसित करणे यावर महापालिकेने ६० कोटी खर्च केले आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मिळालेल्या ११४ कोटींच्या निधीपैकी ६० कोटी घनकचºयावर खर्च केले आहेत.दर परवडणार का?एमएमआरडीएने तळोजा येथील उसाटणे गावातील २६४ एकर जागेवर एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका, गावे, पालिका हद्दीतील कचºयावर प्रक्रिया करण्याचा तीन हजार कोटींचा प्रकल्प प्रस्तावित केला होता. कल्याण-डोंबिवली ते तळोजा येथे कचरा वाहून नेण्यासाठी वाहतुकीचे प्रतिटन शुल्क परवडणारे नसल्याचा मुद्दा उपस्थित करून महापालिकेने विरोध केला. त्यानंतर सरकारने हा प्रकल्पच गुंडाळला. वाहतूक शुल्क परवडणारे नव्हते; मग वेस्ट टू एनर्जीला ७११ रुपये दर प्रतिटनाला कसा काय परवडणार, असा प्रश्न विचारला जात आहे.प्रकल्पांची क्षमता जास्त अन् कचरा कमीउंबर्डे येथील वेस्ट टू कंपोस्ट, बारोवे, मांडा येथील कचरा प्रकल्प, १३ बायोगॅस प्रकल्प, जैववैद्यकीय प्रकल्प आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प यांची एकूण प्रक्रिया क्षमता १२८३ टन होते. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत दररोज ६४० टनच कचरा गोळा होतो. कचºयाच्या तुलनेत प्रकल्पांची क्षमता दुप्पट असलयाने हे प्रकल्प सक्षमपणे चालू शकतील का ? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहेत. भविष्याच्या दृष्टीने ही क्षमता उपयुक्त असली तरी आताचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.वेस्ट डी कंपोस्टची फवारणीलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : आधारवाडी डम्पिंगवरील एक एकर जागेतील कचºयावर वेस्ट डी कंपोस्टद्वारे प्रक्रिया करण्याचे काम जागरूक नागरिक मंचाने प्रायोगिक तत्वावर ५ नोव्हेंबरपासून हाती घेतले आहे. तेथील कचºयावर मंगळवारी वेस्ट डी कंपोस्टचे द्रावण फवारण्यात आले. त्याची पाहणी आयुक्त गोविंद बोडके यांनी मंगळवारी केली.आमदार नरेंद्र पवार व मंचाचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी कचरा वर्गीकरणाचे हे काम हाती घेतले आहे. १२ कचरा वेचक महिलांच्या मदतीने दररोज ४० गोण्या प्लास्टीक कचरा वेगळा केला जात आहे. तेथील विघटनशील कचºयावर मंगळवारी वेस्ट डी कंपोस्टचे द्रावण फवारण्यात आले. त्याची पाहणी बोडके यांनी केली. द्रावण फवारल्याने एक एकर जागेतील विघटशील कचºयाचे ३५ दिवसांत विघटन होऊन त्याचे खत तयार होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास कचºयावरील प्रक्रियचे हे मॉडेल राज्यभरात अनुकरणीय होऊ शकते, असा दावा घाणेकर यांनी केला आहे.जनसुनावणी वादळी ठरणार?टिटवाळा : मांडा-टिटवाळा परिसरात होणाºया डम्पिंग ग्राउंडला सर्व पक्ष आणि नागरिकांनी विरोध केला आहे. यासंदर्भात बुधवारी टिटवाळा शहरात प्रदूषण विभाग जनसुनावणी घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या परिसरातील नागरिकांनी सोमवारी बैठक घेत वातावरण निर्मिती केली. त्यामुळे जनसुनावणी वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक नगरसेविका आणि उपमहापौर उपेक्षा शिक्तवान भोईर यांनीही या डम्पिंग ग्राउंडला विरोध केला आहे. तसेच सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक बैठका घेऊन निषेध करत आहेत. यासंदर्भात सोमवारी रात्री प्रथमेश मंगल कार्यालयात मांडा-टिटवाळा येथील रहिवासी आणि राजकीय कार्यकर्त्यांची उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बुधवारी होणाºया जनसुनावणीदरम्यान याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :thaneठाणेGarbage Disposal Issueकचरा प्रश्न