शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

काय आहे मुलांसाठीचा कायदा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:40 PM

हरवलेलं मुक्काम पोस्ट

विजय जाधव

बालकांसंदर्भात विचार करताना प्रत्येक मोठी व्यक्ती आम्ही मुलांच्या भविष्याचा विचार करतो आहोत, असे सांगते. परंतु, मुलांना हे मान्य आहे का, याचा मात्र विचार करत नाही. याबाबत, आपण अनेक वेळा बोललो आहोत, परंतु काही पालकांच्या वागण्यामुळे किंवा त्यांच्या काही निर्णयांमुळे मुलांना खूपच त्रास होतो. तो त्रास शारीरिक किंवा मानसिक तर असतोच, परंतु सामाजिकसुद्धा असतो. मुलंही समाजात वावरतात. पालकांच्या वागण्याने मुलांना समाजात वावरताना विविध प्रश्नांना किंवा अनेक टीकांना सामोरे जावे लागते.मुलांच्या या समस्येविषयी कायदे काय सांगतात, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. बालन्याय अधिनियम २०१५ या कायद्याच्या प्रकरण-९ मध्ये बालकांसंदर्भातील इतर अपराधांबाबतच्या तरतुदी केल्या आहेत. कलम ७४ ते ८९ मध्ये त्या दिलेल्या आहेत.(लेखक महाराष्टÑ राज्याच्या बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य आहेत.) कलम ७४ बालकाची ओळख उघड करण्यावर प्रतिबंधकोणत्याही वर्तमानपत्र, मासिक, वार्तापत्र, वृत्तवाहिनीमध्ये कायद्याशी संघर्ष करत असलेल्या बालकाचे नाव, पत्ता किंवा कोणताही तपशील उघड केला जाता कामा नये. कोठेही तो तपशील प्रकाशित करता येत नाही, परंतु ज्यांना अधिकार आहे, त्यांच्या परवानगीने व बालकांच्या हिताचे असल्यास लेखी कारणे नोंदवून परवानगी देता येऊ शकते. अनेक ठिकाणी या कायद्याचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसते. समतोलच्या मन:परिवर्तन शिबिर समारोपामध्ये येणाऱ्या मान्यवरांना, समतोल मित्रांना याची सूचना आम्ही वारंवार करत असतो. परंतु, याबाबतीत आणखी जनजागृती होणे गरजेचे व आवश्यक आहे, असे दिसते. यासाठी दंडही आहे आणि शिक्षाही आहे, परंतु जनजागृती झाली तर याबाबतीतील समस्या कमी होण्यास नक्की मदत होऊ शकते.कलम ७५ बालकाला क्रूरपणे वागविण्याबद्दल शिक्षाबालकांचा ताबा किंवा नियंत्रण असलेल्या कोणत्याही व्यक्तीने जर बालकावर हल्ला केला, गैरवापर केला, त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तेही जाणीवपूर्वक केले. एकूणच बालकाला शारीरिक, मानसिक त्रास होईल, असे वागले तर त्या व्यक्तीला शिक्षा व दंड देण्याची तरतूद आहे. आजही अनेक पालक आपल्या मुलांना आपण त्यांचे मालक असल्यासारखे वागवतात. मुलांबाबतीत अनेक मोठ्या व्यक्तींवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाल्याची फार कमी नोंद आहे. जर आपण यासंदर्भात जागृती वाढवली तर अनेक मुलांना सुरक्षित वाटेल. शिवाय, मोठ्या व्यक्तींना जे बालकांना क्रूरपणे वागवतात, त्यांना शिक्षा होऊ शकते.कलम ७६ भीक मागण्याच्या कामासाठी बालकांना राबविणेजे कोणी मुलांना भीक मागण्याच्या उद्देशाने कामाला लावतील, त्यांचा उपयोग करून घेतील, अशांनाही शिक्षा होऊ शकते व दंडही होऊ शकतो. परंतु, याबाबत आमच्याकडे सुरक्षायंत्रणेत जागृती करण्याची गरज आहे. शिवाय, याबाबतीत व्यवस्था व सहकार्य शासकीय स्तरावर असणे गरजेचे आहे.कलम ८९ बालकाने केलेला गुन्हाकोणतेही बालक जे या प्रकरणाखाली अपराध करते, अशा बालकाला कायद्याशी संघर्ष करणारे बालक समजले जाते. म्हणजेच मुले गुन्हेगार नसतात. आपल्या समाजात मुलांविषयी बरेच गैरसमज आहेत. आपण हा कायदा समजून न घेतल्याने अनेक अडचणी येतात, परंतु समजून घेतले तर बालक व पालक यांच्यातील समन्वय वाढेल. शिवाय, मुलांच्या समस्यांवर चर्चा होत राहतील. अनेक मुलांना त्यामुळे न्याय मिळू शकेल आणि बालप्रेमी समाज तयार होण्यास प्रतिसाद मिळेल.कलम ८१ कोणत्याही बालकांची विक्र ी करणे किंवा मिळवणेजी व्यक्ती कोणत्याही हेतूने बालकांची विक्र ी करेल किंवा त्यांना खरेदी करेल अशा कोणत्याही व्यक्तीला पाच वर्षापर्यंत कठोर शिक्षा होऊ शकते.अनेक कलमे यामध्ये लिहिली नाहीत. कारण, मला वाटते महत्त्वाची काही कलमे समाजाच्या लक्षात येणे आवश्यक आहे. जसे मुलांना भीक मागताना आपण रोज बघतो, मुलांची विक्र ी होतानाचे वृत्त वाचतो. त्याचप्रमाणे मुलांना क्रूरपणे वागवताना आपण सोशल मीडियावर बघतो. हे सर्व बघताना, ऐकताना आपल्या संवेदनशीलता जागृत होतात, परंतु यासाठी काय करायचे म्हणून ठरावीक कलमांचा व त्यासंदर्भातील माहितीचा उल्लेख केला आहे. समतोल या बाबतीत बालन्याय अधिनियम २०१५ व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण २०१२ यावर महानगरपालिका व जि.प. शाळांमध्ये जनजागृती रक्षा अभियान म्हणून करत आहे. सध्या शाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. मुलांना शालेय वस्तू देण्याचा सपाटा सुरू आहे, परंतु ज्या शाळांमध्ये आपण मुलांना दाखल करणार आहात, मग ती शाळा इंटरनॅशनल असो किंवा साधी जि.प.ची असो, प्रत्येक शाळेत बालकांचे कायदे व त्याबद्दलची माहिती शाळेत दिली जाते का? याची जरूर माहिती घ्यावी. कारण, आपले मूल सुरक्षित, संरक्षित असायला तर हवेच, शिवाय त्याच्यासाठी असलेल्या कायद्यांची त्याला माहिती असणे गरजेचे व आवश्यक आहे. यासाठी आपण मोठ्या व्यक्तींनी पुढे येऊन बालप्रेमी बनले पाहिजे.

टॅग्स :thaneठाणे