लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील जागा ही मोकळी ठेवण्याऐवजी त्यावर अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम केल्याच्या तक्रारीवर आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊनही अधिकारी कारवाई करत नाही . रहिवाशांच्या न्यायासाठी पालिकेचे किती वर्ष उंबरठे झिजवायचे ? असा सवाल येथील रहिवाशांनी केला आहे .
मीरारोडच्या शांतिपार्क येथील श्री साई प्लाझा सहकारी गृहनिर्माण संस्था गृहसंकुल आहे . सदर इमारतीत डॉन बॉस्को शाळा आहे . येथील रहिवाश्यांच्या गृहनिर्माण संस्थेने शाळेच्या चालकांनी बेकायदा बदल केला. बेकायदा जिना , कार्यालय , गेट आणि भलीमोठी पत्रा शेड बनवून सार्वजनिक सोसायटीची जागा बळकावल्याची तक्रार केली होती . तर पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी ६ जून रोजी शाळेच्या चालकास वेदरशेड ची परवानगी रद्द केल्याचे व शेड २४ तासात काढून टाकण्याची नोटीस दिली .
विशेष म्हणजे एकाच जावक क्रमांकावर दोन परवानग्या दिल्या गेल्याची बाब देखील रहिवाश्यांनी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली . रहिवाश्यांनी जून महिन्यात अनेकदा महापालिका मुख्यालयात उपायुक्त रवी पवार सह आयुक्त संजय काटकर यांना लेखी तक्रार देत गृहसंकुलातल्या शाळा संचालकांनी केलेल्या अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामावर कारवाईची मागणी केली . या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करावा असे रहिवाश्यांचे म्हणणे आहे . सदनिकां मध्ये बदल करून शाळा कशी काय चालवली जाते ? मुलांच्या जीवाशी खेळ न करता नियम निकष नुसार योग्य ठिकाणी शाळा असावी असे अनेक नागरिक सांगतात .
पोलिसां कडे देखील रहिवाश्यांनी तक्रारी केल्या आहेत . तर महापालिकेने गृहसंकुलात केलेल्या ह्या बेकायदा बांधकाम प्रकरणी ठोस तोडक कारवाई करण्यास टाळाटाळ चालवली असून सामान्य रहिवाश्याना त्यांच्या न्याय हक्का साठी पालिकेचे आणखी किती वर्ष उंबरठे झिजवायला लागणार आहेत ? असा सवाल केला आहे . ६ जून रोजी शेड २४ तासात काढण्याची नोटीस दिली तर आज २८ जून उजाडला तरी पालिकेने येथील बेकायदा बांधकामां वर कारवाई केली नाही . येथे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदार पालिकेची असेल असा आरोप रहिवाशी यांनी केला आहे .
महापालिका उपायुक्त रवी पवार यांनी सांगितले कि, शेड काढून टाकण्याची नोटीस दिली आहे . शाळेतील मुलांच्या वेळे व्यतिरिक्त अन्य दिवस निश्चित करून लवकरच बेकायदा कामांवर कारवाई केली जाईल . ह्या बाबत आयुक्त यांच्याशी चर्चा झाली आहे .