कल्याण : केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी पदभार घेऊन तीन महिने उलटले आहेत. मात्र, तरीही शहरातील अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे मनसेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी बोडके यांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधले.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, सुदेश चुडनाईक, राहुल कामत, सागर जेधे, हर्षद पाटील, दीपिका पेडणेकर आदी या वेळी उपस्थित होते.सर्वसामान्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाही. सृतिकागृह नव्याने बांधण्यासाठी अर्थसंकल्पात निधी ठेवला आहे. त्यामुळे या कामाची निविदा कधी काढणार, त्याचे काम कधी होणार? ठाकुर्ली पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. रेल्वे स्थानकांतील फेरीवाल्यांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना चालता येत नाही. शहरांतील बेकायदा रिक्षा स्टॅण्डमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होते. घनकचरा प्रक्रियेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जात नाही. अशा विविध प्रश्नांकडे मनसेने लक्ष वेधले आहे.शहरातील प्रश्नांबाबत अभ्यास करावा लागेल, लगेच काही सांगता येत नाही, असे आयुक्त सुरुवातीला सांगत होते. मात्र, तीन महिने झाल्याने हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करणार आहात, असा जाब मनसेने विचारला.>ठाकुर्ली पुलावर पदपथ बांधण्याची मागणीठाकुर्ली उड्डाणपुलावर पादचाºयांसाठी पदपथ नसल्याने त्यांच्या जीवाला धोका आहे. पुलाच्या पुढील टप्प्यातील कामात पदपथ बांधावा, अशी मागणी मनसेचे परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी केली आहे.पुलावर सोमवारी थ्री व्हिलर टेम्पोचे पुढील चाक हवेत उभे राहिले. तसेच टेम्पो संरक्षक कठड्याला टेकला. परंतु, पदपथ असता तर तो टेम्पो कठड्यापर्यंत जाऊ शकला नसता. पदथामुळे वाहन कठड्याला धडकून रूळावर पडण्याची शक्यताही कमी होईल. त्यासाठी रस्त्याच्या बाजुला काही उंचीवर पदपथ बांधावा, अशा मागणीचे निवेदन म्हात्रे यांनी केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके, महापौर विनीता राणे यांना दिले आहे.
समस्या सोडवण्यासाठी काय करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 3:24 AM