शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

डोंबिवलीत रिक्षेला पर्याय काय?

By admin | Published: July 05, 2017 6:11 AM

रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारमुळे शहरातील प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. सध्या पावसाळ््यात रात्री साडेआठ नंतर रिक्षाच मिळत

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारमुळे शहरातील प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. सध्या पावसाळ््यात रात्री साडेआठ नंतर रिक्षाच मिळत नाहीत. लोकलच्या गर्दीतून घुसमटलेल्या प्रवाशांना रिक्षेसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी कमालीचे हैराण झाले आहेत. त्यांच्या संतापाला सामोरे जाताना रिक्षेला नवा वाहतुकीचा पर्याय देण्याचे नवे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर उभे आहे.रेल्वे स्थानकालगतच्या रिक्षा तळांवर विशेषत: रात्री ८.३० नंतर रिक्षाच नसतात. त्यामुळे तेथे रात्री ११ पर्यंत प्रवाशांची रांग असते. रिक्षा कमी असल्याने प्रवाशांचा लोंढा वाढतो. रिक्षा मिळत नसल्याने प्रवाशांच्या संताप होतो. मागील आठवड्यात दोनदा प्रवाशांनी रिक्षा रोखून धरल्या होत्या. वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस गोविंद गंभीरे यांनी कशीबशी परिस्थिती हातळली असली तरीही पावसाळ््यातील पुढील तीन महिने अशीच स्थिती राहिल्यास प्रवाशांचा उद्रेक होण्याची भीती आहे. रात्रीच्या वेळी अशा घटना घडत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल, याचे दडपण वाहतूक विभागासमोर आहे.प्रवाशांसाठी मागील आठवड्यात वाहतूक विभागाने केडीएमटीची मदत केळकर रोड ते ग्रोगासवाडी व्हाया मानपाडा रोडदरम्यान दोन ते तीन बस फेऱ्या चालवल्या. पण या फेऱ्या अपुऱ्या आहेत. त्यामुळे जास्तीच जास्त बस रात्री रस्त्यावर आणावण्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. गंभीरे यांच्या विनंतीमुळे एका खासगी बसचालकानेही प्रवाशांना सुविधा दिली. पण त्यात सातत्य राहणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी संयम बाळगावा, असे आवाहन प्रवासी संघटनांनी केले.पावसाळ््यात रिक्षांना मागणी जास्तरिक्षा रस्त्यावर नसल्याची समस्या पावसाळ््यात मोठ्या प्रमाणावर जाणवते. अन्य मोसमांमध्ये नागरिक सायंकाळीही रिक्षा करतातच असे नाही. पण पावसाळ््यात ज्याला त्याला घाई असते. त्यामुळे रिक्षांची मागणी वाढते. पण रिक्षाचालकही दिवसभर पावसातच व्यवसाय करतो. त्यात काहींना दिवसभराचे उत्पन्न मिळते. तर काही जण पावसाचा जोर बघूनच रिक्षा बाहेर काढत नाहीत, असे रिक्षा युनियनचे पदाधिकारी दत्ता माळेकर म्हणाले.पावसाळ््यात खड्ड्यांमुळेही कोंडी होते. त्यातही अनेकदा रिक्षा अडकतात. रिक्षाचालकांना रस्त्यावर उतरण्यासाठी सक्ती कशी करणार? पण याप्रश्नी उपाययोजना, तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यासाठी वाहतूक विभागाला सहकार्य करण्याची तयारी आहे, असेही ते म्हणाले.