शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

बेकायदा विदेशी नागरिकांना महाराष्ट्रातून बाहेर काढण्यात गैर काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 1:26 AM

आताचे महाराष्ट्रातील राजकारण ज्या टप्प्यावर उभे आहे. राजकीय नैतिकता अजिबात उरलेली नाही. मत कोणत्या विचारांना दिले, कोणत्या पक्षाला दिले, त्याने कोणाशी युती केली.

- अभिजित पानसे, मनसे नेतेहिंदुत्वाची भूमिका आधी घेतली, नंतर घेतली असा भागच नाही. झेंड्यामध्ये प्रामुख्याने भगवा रंग आहे आणि मनसेची सर्वसमावेशक अशी भूमिका कायम राहिलेली आहे. मनसेची भूमिका ही महाराष्ट्राकरिता आहे. महाराष्ट्रात जेवढे घटक आहेत, त्या घटकांना कायम सामावून घेणारा मनसे हा पक्ष राहिलेला आहे. त्यामुळे हिंदुत्वाची वेगळी भूमिका असा भाग येण्याचा प्रश्न नाही. भूमिका तीच असेल मात्र काही गोष्टी बदलतील, हे नक्की. जसे की, ज्याप्रमाणे आताचे महाराष्ट्रातील राजकारण ज्या टप्प्यावर उभे आहे. राजकीय नैतिकता अजिबात उरलेली नाही. मत कोणत्या विचारांना दिले, कोणत्या पक्षाला दिले, त्याने कोणाशी युती केली.भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता आज शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरत आहेत. पण भाजपनेही त्याच चिखलात उडी मारली आणि राष्ट्रवादीबरोबर गेले. ज्या अजित पवारांबाबत इतके बोलले, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसशी कदापि युती करणार नाही, असे बोलत होते. नंतर मात्र त्यांच्यासोबतच गेले. महाराष्ट्राचे राजकारण इतके सत्ताप्रिय झाले आहे, की लोकं महाराष्ट्राविषयी कधी काय करू शकतात, ही भूमिका वेगळी राहिली. आता मात्र एकमेकांना वाचविणे आणि एकमेकांना हात धरून आपापली दुकाने चालविणे अशा वळणावर राजकारण आले आहे. सगळ्यांना राजकारणाचा तिटकारा आला आहे. अशा वेळेला मनसेची महाराष्ट्रवादी भूमिका आहे आणि ही प्रकर्षाने पुढे येईल. लोक राज ठाकरे यांच्याकडे नेतृत्व म्हणून पाहत आहेत. आधी काय झाले मनसेचे किंवा नंतर काय झाले, पण आता या टप्प्यावर निदान एक महाराष्ट्रातील राजकीय व्यक्ती महाराष्ट्राविषयी बोलतेय, हे लोकांना कळेल आणि त्यांना कळतं. त्यामुळे आमचे स्थान दिवसेंदिवस प्रबळ होत जाईल. जे महाराष्ट्रात मराठी बोलतात, मराठी वाचतात त्या लोकांसाठी मनसे कायमस्वरुपी आहे. पुण्यात, मुंबईत पाहिले तर जैन, गुजराथी हे लोक उत्तम मराठी बोलतात ते मराठी आहेत, असेच आम्ही मानतो आणि त्या मराठी लोकांना सामावून घेणे, ही मनसेची कायम भूमिका आहे.मीडियाच्या अपप्रचारामुळे मनसेची भूमिका एकांगी असल्याचे काही लोकांचे विनाकारण मत आहे. पण तसे अजिबात नाही. मुंबई सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात तर इतर जाती धर्माचे लोक उत्तम मराठीत व्यवहार करतात. मुंबईतही हे घडले पाहिजे आणि त्याचमुळे मनसेची कधीपासून मागणी होती की, कोणतेही बोर्ड असले तरी मराठी विषय अनिवार्य हवा, त्याची घोषणा झालेली आहे. पण त्याची अंमलबजावणी कितपत होते हा महाराष्ट्रसमोर कायम प्रश्न राहिलेला आहे. बाहेरुन येणाऱ्या लोकांना हाकलवून देण्याचा प्रश्न हा एका विशिष्ट समाजापुरता नाही. आता नायजेरियन आले आहेत, त्यांना आपल्या घरात ठेवायचे आहे का? त्यांना लाथ मारुन पाठविले पाहिजे.भारतात अवैधरीत्या आलेल्या कोणत्याही माणसाला लाथ मारुन पाठविले पाहिजे तरच शिस्त राहील. हे लोक येणार अनधिकृत बांधकाम करून वाट्टेल तिथे झोपड्या बांधणार, चिरीमिरी देणार. राज ठाकरे वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना विनंतीवजा सांगत आहेत की, आपली माती, आपली आई विकू नका. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. जे पिढ्यान्पिढ्या इथे राहत आहेत, ते महाराष्ट्रातील मराठीच आहेत. मनसे भाजपसोबत जाणार यात काहीही तथ्य नाही. कारण, मनसे आतापर्यंत एकटी लढलेली आहे आणि एकटीच लढेल. या चर्चेला काहीही अर्थ नाही. भेटीगाठी होत असतात, भेटीगाठी झाल्या म्हणजे त्याचा लगेच राजकीय अर्थ काढू नये.- शब्दांकन : प्रज्ञा म्हात्रे

टॅग्स :MNSमनसेPoliticsराजकारणthaneठाणे