शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

फूल बाजाराच्या इमारतीस परवानगी कधी?

By admin | Published: March 08, 2017 4:14 AM

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे फूल बाजारासाठी नव्याने इमारत बांधली जाणार आहे. त्यासंदर्भात बाजार समितीने कल्याण-डोंबिवली महापालिकेस प्रस्ताव सादर केला आहे

- मुरलीधर भवार, कल्याणकल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे फूल बाजारासाठी नव्याने इमारत बांधली जाणार आहे. त्यासंदर्भात बाजार समितीने कल्याण-डोंबिवली महापालिकेस प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव महासभेत मंजूर झाला असतानाही महापालिकेच्या नगररचना विभागाकडून त्याबाबतचे पत्र अजूनही बाजार समितीला मिळालेले नाही. त्यामुळे फूल बाजाराची इमारत रखडल्याने हा बाजार सुसज्ज कधी होणार, असा सवाल केला जात आहे.कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ४० एकर जागा आहे. त्यौपकी एक एकर जागेवर फूल बाजार भरतो. पत्र्याच्या शेड बांधलेल्या जागेत हा फूल बाजार चालतो. या बाजारात दररोज दोन टन विविध फुलांची विक्री होती. दादर फूल बाजारनंतर दोन नंबरचा फूल बाजार म्हणून या बाजाराचा नंबर लागतो. या बाजारात नगर, आळेफाटा, जुन्नर, संगमनेर, नाशिक येथून फूले विक्रीस येतात. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर तसेच ग्रामीण भागातील फूलविक्रेते आणि हार व बुके तयार करणारे या बाजारात फूले खरेदीसाठी येतात. त्यांना हा बाजार सोयीचा पडतो. सध्या फूल बाजारात दाटीवाटीने व्यापार केला जातो. पत्र्याची शेड असल्याने व्यापाऱ्यांना उन्हाळ््यात प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागतो. फूले सुकून जातात. तर पावसाळ््यात तर भिजून सडतात. फुले साठवण्यासाठी येथे जागा तसेच शीतगृह नाही. फूल बाजारात प्रसाधनगृहांची सोय नसल्याने महिला व्यापाऱ्यांची तसेच येथे येणाऱ्या ग्राहकांची कुचंबना होते. त्याचबरोबर फूलबाजार परिसरात प्रचंड प्रमाणात स्वच्छता असते. दुर्गंधी, डासांचा उपद्रव यामुळे येथील व्यापारी त्रस्त आहेत. या विविध असुविधांवर मात करण्यासाठी बाजार समितीने एक एकर जागेवर तळअधिक एक मजल्याची फूल बाजाराची इमारत बांधण्यासाठी प्रस्ताव मंजूर केला. नव्या इमारतीत पहिल्या मजल्यावर महापालिकेचे फेरीवाले व तळ मजल्यावर फूलविक्रेते अशी रचना असणार आहे. नव्या इमारतीच्या बांधकामावर ८ कोटी ४३ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. हा बांधकाम खर्च बाजार समिती करणार आहे. फूल बाजार बांधण्यासाठी महापालिकेस मोकळ््या जागेच्या बदल्यात १६ लाख ५४ हजार रुपयांचा कर बाजार समितीने भरला आहे. तसेच नव्या इमारतीच्या बांधकामाची परवानगी मिळावी, यासाठी महापालिकेस प्रस्ताव सादर केला आहे. महापालिकेने फूल बाजाराच्या इमारतीस बांधकाम परवानगी देण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर केला आहे. मात्र महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगीचे पत्र अजूनही बाजार समितीला मिळालेले नाही.नेमकी अडचण काय आहे?- बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे तीन महिन्यांपासून महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. परवानगी मिळेल, असे आश्वासनच रवींद्रन यांच्याकडून त्यांना दिले जात आहे. परंतु, परवानगी देण्यात काय अडचण आहे, हे रवींद्रन यांच्याकडून काहीच सांगितले जात नाही. - घोडविंदे भेटीला गेल्यावर रवींद्रन त्यांच्यासमोर नगररचना विभागाकडून केवळ फाइल मागवून घेतात. त्यानंतर त्यावर कोणताही शेरा ते मारत नाहीत. इमारतीच्या बांधकामाला परवानगी मिळणार आहे की नाही, हे रवींद्रन यांनी स्पष्ट सांगावे. त्यानंतर पुढे काय करायचे ते आम्ही ठरवू. - रवींद्रन यांनी परवानगी न दिल्यास राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे दाद मागितली जाईल, असे घोडविंदे यांनी सांगितले.