शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कारवाईचा फुसका बार... रेतीमाफिया फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 2:12 AM

ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी खाडी व नदीकिनारी रेतीचे होणारे बेकायदा उत्खनन प्रशासनाच्या कारवाईनंतरही बिनदिक्कत सुरू आहे.

कारवाया करुनही उपसा सुरुच :ठाणे जिल्ह्यात नुकतीच बेकायदा रेतीउपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. रेती उपसण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात जप्त केली. मात्र गुन्हे काही नोंदवले गेले नाहीत, कारण कुणीच आढळून आले नाही. यापूर्वीही प्रशासनाने अशा कारवाया करूनही उपसा काही थांबलेला नाही. ‘लोकमत’चे प्रतिनिधी सुरेश लोखंडे, अजित मांडके, अनिकेत घमंडी, धीरज परब, नितीन पंडित, कुमार बडदे यांनी जिल्ह््यात विविध ठिकाणी राजरोसपणे सुरू असलेल्या या अवैध धंद्याचा पर्दाफाश केला आहे.जिल्ह्यात ठिकठिकाणी खाडी व नदीकिनारी रेतीचे होणारे बेकायदा उत्खनन प्रशासनाच्या कारवाईनंतरही बिनदिक्कत सुरू आहे. मुंब्रा, कळवा, दिवा, कोपर खाडीसह जिल्ह्यात ठिकठिकाणी होणारा बेकायदा रेती उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई केली. जिल्हाभरात एकाच दिवशी पाच ठिकाणी कारवाई केल्याने रेतीमाफियांचे धाबे दणाणले. त्यांच्या बार्ज, सक्शनपंप आणि रेतीसाठा प्रशासनाने जप्त केला. पण महत्वाचे म्हणजे, तेथे काम करणारा साधा मजूरही कारवाईदरम्यान पथकाच्या हाती लागला नाही. या कारवाईनंतर कोपरखाडीसह अन्यही ठिकाणी सक्शन पंपव्दारे रेती उपसणाऱ्या मोठमोठ्या बार्जमधील चढाओढ सुरू होती.रेती उपसा करून किनाºयावर साठवणूक करणारे आणि त्यांची वाहतूकही सर्वांच्या नजरेत येते. पण धडक कारवाईच्यावेळी मात्र एकही व्यक्ती सक्शनपंप, बार्जवर प्रशासनास दिसून येत नसल्याची चर्चा नेहमीच होते, ती यावेळीही झाली. जिल्ह्यात वर्षभरात सहा ठिकाणी कारवाई होऊन रेतीमाफियांना सळो की पळो करणा-या प्रशासनाला मात्र एकावरही गुन्हा नोंदवता आला नाही. या दहा ठिकाणी कारवाईत एकही व्यक्ती, रेतीमाफिया घटनास्थळी आढळली नाही. यामुळे काही ठिकाणी निनावी गुन्हे दाखल करण्याचा प्रसंग ओढावल्याचे दिसून येते. पाच ठिकाणच्या कारवाईत सहा कोटी ४८ लाखांचा मुद्देमाल नष्ट केल्याचे सांगून प्रशासनाने आपली पाठ थोपटून घेतली. मात्र प्रत्यक्षात चार कोटी ६० लाख ४३ हजार किंमतीची रेती व सामग्री जप्तीसह बार्ज, सक्शनपंप तोडून नष्ट केले.या कारवाईच्या आधीही जुलै, आॅगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये काही दिवसांच्या फरकाने पाच ठिकाणी कारवाई झाली. यामध्ये काल्हेर - कशेळीच्या कारवाईत एक बार्ज, सक्शनपंप जप्त करत १५ लाखांची सामग्री नष्ट करून काही जप्त केली. मुंब्रा येथे एक बाजे, भरोडी अलिमघर दोन बार्ज दोन पंप या दोन्ही कारवाईत अनुक्रमे १० व २० लाख किंमतीच्या नुकसानीचा फटका भूमाफियांना बसला. याशिवाय मुंब्रा रेतीबंदर खाडीत १२ दिवसांच्या फरकाने दोन कारवाया केल्या असत्या त्यात पाच सक्शनपंपसह तीन बार्ज म्हणजे मोठे लोखंडी जहार नष्ट केले. या दोन कारवाई दरम्यान १० आणि ५५ लाखांची सामग्री जप्तीसह नष्ट केल्याचे दिसून येते. या पाच ठिकाणच्या घटनांमध्ये एक कोटी दहा लाखांची सामग्री नष्ट व जप्त करण्याची धडक कारवाई झालेली आहे. पण एकाही रेतीमाफियाला अटक झालेली नाही. रेतीमाफियांना कारवाईची चाहुल लागताच घटनास्थळावरील मजूर पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे उत्तर ऐकवणे प्रशासनालाही आता कमीपणाचे वाटत नाही. यामुळे गुन्ह्याची नोंद नाही किंवा कांदळवन नष्ट करून भूखंड हडपणाºया भूमाफियांवर ठोस कारवाई होऊनही कुणाला स्थानबध्द केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे बेकायदा रेतीउपशा विरोधातील कारवाईचा फुसका बार... रेतीमाफिया फरार! असेच वर्णन करता येईल.निवडणुकीच्या कालावधीमुळे रेती, भूमाफियांवर कारवाई करणे शक्य झाले नसल्याचे प्रशासनाकडून या आधी ऐकायला मिळाले. निवडणुकीची ही कमी भरून काढण्यासाठी आणि प्रशासन जागे असल्याचे सिध्द करण्यासाठी नुकतीच झालेली वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई आणि तीनही रेतीमाफियांना चाहुलही न लागता केल्याचे सांगितले जात आहे. यात ३३० ब्रास रेती जप्तीसह ३४ सक्शनपंप, २३ बार्ज म्हणजे खाडीतून रेती वाहून आणणारे मोठे लोखंडी जहाज गॅस कटरने तोडून त्यांचे तुकडे केल्याचे आणि किनाºयावर रेती साठवणारे २१ कुंड्या तोडल्याचे उघड करण्यात आले. या साडेसहा कोटींच्या मुद्देमालावर कारवाई केल्याचे प्रशासनाकडून भासवले जात आहे. मात्र खरे आरोपी, रेतीमाफिया पथकाच्या हातावर तुरी ठेवून पळाल्याचे वास्तव या धडक कारवाईतही उघड झाले. गुन्हा नोंदवण्याची कारवाई करत रेतीमाफियांच्या मुसक्या आवळल्या नसल्याची खंत पर्यावरणपे्रमी व जाणकारांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यातील तानसा नदीसह नुकत्याच झालेल्या या कारवाईत मुंब्रा पारिसक कळवा रेती बंदर, काल्हेर रेती बंदर, वडूनवघर, खारबाव, वेहळे, उल्हास नदी खाडी पात्र, टेभा, तानसा नदी आदी या खाडी नदीकिनारी सक्शन पंपांच्या मदतीने बेकायदा रेती उपशावर कारवाई एकाच दिवशी झाली. यासाठी १४ तहसीलदार आणि १५० कर्मचाऱ्यांच्या पथकाने ३४ सक्शनपंप व २३ बार्जचे गॅस कटरच्या मदतीने तुकडे केले. तर ३३० ब्रास रेती साठा आणि ५० ठिकाणी रेती साठवण्यासाठी उभारलेले हौद जमीनदोस्त केले. पण या कारवाईमुळे रेतीमाफियांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याचे अधिकाºयांकडून ऐकवले जाते. कोपरखाडी, मुंब्रा पारिसक कळवा रेतीबंदर, गणेश घाट परिसरात रेती उपशाचे काम मात्र सुरूच असल्याचे आजही दिसून येत असल्यामुळे रेतीमाफियांवर कारवाईचा हा केवळ फार्स असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.मुंब्रा पारसिक व कळवा बंदराच्या कारवाईतील आठ सक्शन पंप आठ बार्ज जप्त करून त्यांचे तुकडे केल्याचा समावेश आहे. या सारखीच स्थिती भिवंडीच्या खाडीत नऊ सक्शन पंप व सहा बार्ज आणि ३३० ब्रास रेती जप्तीची कारवाई झाली. यामध्ये काल्हेरखाडी, वडूनवघर, खारबांव, वेहळे या ठिकाणांचा समावेश आहे. भिवंडीच्या कारवाईत दोन कोटी २१ लाख ४३ हजारांच्या मुद्देमालावर कारवाई झाली. भिवंडीच्या या कारवाईत सर्वांधिक मालमत्ता हस्तगत केली असली तरी या खालोखाल उल्हासनदी खाडीपात्रातील कारवाईत एक कोटी ४५ लाखांंचा मुद्देमाल, मुंब्रा पारसिकला ४० लाख, शहापूरच्या टेंभा, तानसातील कारवाईत प्रत्येकी दहा लाख आणि अंबरनाथच्या कारवाईत बेकायदा रेती वाहतुकीची चार वाहने, दोन सक्शन पंप या अनुक्रमे दहा लाख, २४ लाखांचा ऐवज हस्तगत झाल्याचे प्रशासन सांगते. जिल्ह्याभरासाठी १५ अधिकारी १५० कर्मचाºयांच्या मनुष्यबळासह दोन बोटी, दोन हायड्रो, दोन पोकलेन, तीन गॅस कटर, चार जेसीबी, एक बार्ज या साहित्याचा वापर करण्यात आला.खाडी, नदी पात्रात बेकायदा रेती उत्खनन करणारे हे पट्टीचे पोहणारे असतात. या कामगारांना, मजुरांना गाडी दिसताच किंवा काठावरील हालचाली लक्षात येताच ते पटापट पाण्यात उड्या मारतात आणि पळून जातात. ते हातात सापडत नाही आणि जप्त केलेले बार्ज, सक्शनपंपावरही हक्क सांगत नाही. तरीही आपण मुंब्रा पारसिक आणि कळव्याच्या खाडीतील कारवाईच्यावेळी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.- मुकेश पाटील, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय,रेती गट विभाग दिवसरात्र बिनधास्त उपसा सुरूएकीकडे पंपाद्वारे रेती काढली जात असतांना दुसरीकडे डुबी मारुन रेती काढण्याचा व्यवसाय जो पूर्वी अधिकृतपणे सुरु होता, तो आता बेकायदा सुरु असल्याची बाबही समोर आली आहे. पर्यावरणाचा ºहास होत असल्याचे कारण पुढे करुन प्रशासनाच्या वतीने रॉयल्टी बंद केली आहे. त्यामुळे डुबी मारुन रेतीचा व्यावसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे जरी खरे असले तरी दुसरीकडे ठाणे शहरातील गायमुख नागलाबंदर, कोलशेतबंदर, मुंब्रा रेतीबंदरच्या खाडीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून डुबी व हातपाटीपध्दतीने रेती काढण्याचे काम सुरू आहे.या कामाला सरकारने बंदी घातल्यापासून स्थानिकांना रोजगाराला मुकावे लागले होते. सरकारी पातळीवर ही बंदी उठली आहे. मात्र अद्याप या रेतीउपसा पध्दतीच्या परमीटचे वाटप झाले नसताना काळोख्या रात्रीत आणि दिवसाढवळ्या गायमुखच्याबंदरावर रेती उपसा केला जातो. बांधकामासाठी नदीची रेती दर्जेदार समजली जाते. ठाणे, मुंबईसारख्या शहरात ही रेती मिळताना बांधकाम व्यावसायिकांना चांगला भाव मोजावा लागतो. नदीचे स्त्रोत हे शहराबाहेर असल्यामुळे मुरबाड, नगर, पुणे अशा ठिकाणाहून ही रेती मुंबई, ठाण्यात आणली जाते. या रेतीला सध्या दोन ब्रासला १२ ते १३ हजार मोजावे लागतात. परंतु ते परवडण्यासारखे नाही, त्यामुळे आता अधिकृतपणे सुरु असलेला रेती व्यवसाय दिवसाच्या उजेडात आणि रात्रीच्या अंधारात सुरु आहे. मात्र यामध्ये सगळेच सामील होत असल्याचे दिसते. थोडे जरी अंडरस्टॅडींग चुकले तर त्याची किमंत कारवाई करुन मोजावी लागत असल्याचे वास्तवही समोर येत आहे.समुद्राची, खाडीची रेती दमट हवामानातील असते. ही रेती इमारतींच्या बांधकामासाठी वापल्यानंतर थोड्याच दिवसात घरांचे प्लास्टर निखळून जाते. या रेतीला दोन ब्राससाठी ९ हजार खर्च येतो. नदीच्या रेतीपेक्षा खाडीच्या रेतीचा भाव अर्धा कमी असल्यामुळे अनेक बांधकामधारक या रेतीला पसंती देतात. हातपाटी, डुबी मारून रेती काढण्याबरोबर सक्शन पंपाद्वारे रेतीचा उपसा केला जातो. ठाण्यात गायमुख -नागला, कोलशेतबंदर, मुंब्रा -दिवा रेतीबंदर ही रेती काढण्याची ठिकाणे आहेत. बेकायदा रेतीउपशावर तहसीलदार कार्यालयाकडून कारवाई होत असली तरी प्रत्यक्षात गायमुखच्या बंदराला भेट दिली असता त्या ठिकाणी बिनदिक्कतपणे विनापरवाना रेती उपसा सुरू होता. या ठिकाणी दोन रेती व्यवसायिकांशी चर्चा केली तर रेती मिळेल पण जागेवर पोहचवली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या परवानगी नाही, त्यामुळे फुकटची रिस्क कोण घेणार असा प्रतिसवाल एका व्यापाºयाने केला. परंतु एवढी रिस्क घेऊनही एका गाडीसाठी ५ हजारांच्या आसापास पैसे घेऊ असेही ते सांगायला विसरले नाहीत. सध्या थंडी असल्याने माल चांगला मिळत नाही. मात्र माल कुठे पाहिजे तेथे पोहचवू, एका गाडीला ७ ते १० हजारा पर्यंत खर्च येऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये आम्हाला सगळ्यांना मॅनेज करावे लागत असते, त्यामुळे एवढा खर्च हा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याठिकाणी एका पडावमधून रेती वाहतूक होत असल्याचे दिसले. हा सर्व रेतीचा चोरटा व्यवसाय सुरु असताना रेतीगट शाखा काय काम करते असा सवाल उपस्थित होत आहे. असाच प्रकार वाघबीळ गावातून आतमध्ये गेल्यावर त्याठिकाणीही खाडीचा परिसर आहे. याठिकाणी कारवाईची तशी भिती नसल्याने आणि हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले नसल्याने येथे पहाटेपासूनच डुबी मारुन रेतीचा गोरख व्यवसाय सुरु असल्याचे दिसते. या कामासाठी स्थानिक मुले काम करण्यास नकार देत असल्याने पश्चिम बंगाल किंवा अन्य ठिकाणाहून मुले काम करण्यास येतात. दिवसातून ते किती घमेले रेती काढतात, त्यावर त्यांना पैसे दिले जातात. दुसरीकडे दिवसभर रेती काढल्यानंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, या रेतीची चोरटी वाहतूक सुरु असते. परंतु यामध्ये पोलीस, रेती गट, तहसील कार्यालयातील काही महत्वाच्या अधिकाऱ्यांनाही मॅनेज केले जात असल्याचे काही रेती व्यावसायिकांनी सांगितले. परंतु याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचेही ते म्हणाले.मागील कित्येक वर्षापासून आमचा उदरनिर्वाह हा केवळ रेती व्यावसयावर अवलंबून आहे. त्यामुळे कुटुंब चालवायचे असेल तर आम्हाला हे सर्व करावेच लागत असल्याचे ते सांगतात. परंतु यात कोणी नाराज झाले तर कारवाईची टांगती तलावरही आमच्यावर असते हे देखील तितकेच वास्तव असल्याचे ही मंडळी सांगतात. आज ही चोरटी वाहतुक सुरु असली तरी थंडीच रेती काढतांना फार जिकरीचे काम असते, त्यामुळे एका बोटीतून तीन ते चार ब्रास रेती काढली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.रात्रीस खेळ चाले...रेतीवरील रॉयल्टी बंद झालेल्या परांपरांगत सुरु असलेल्या रेती व्यवसायाला उतरती कळा आली आहे. पूर्वी याच व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह केला जात होता. परंतु आता दिवसा रेतीचा जेवढा जमेल तेवढा उपसा केला जातो. त्यानंतर रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारातून या रेतीची वाहतूक सुरु असते. यामध्ये गस्तीवर असलेल्या पोलिसांपासून ते रेती निर्धारित ठिकाणावर पोहचत नाही, तोपर्यंत सर्वांना मॅनेज करीत पहाटेपर्यंत रेतीची वाहतूक सुरु असते.रेती व्यावसायिकांवर उपासमारीची वेळघोडबंदर भागातील वाघबीळ, गायमुख, नागलाबंदर आदी भागात डुबी मारुन रेती काढली जाते. परंतु काही वर्षांपूर्वी पर्यावरणाचा -हास होत असल्याचे कारण पुढे करत रॉयल्टी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाºया शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. रॉयल्टी सुरु करावी, यासाठी अनेकवेळा आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र या आंदोलनांमधून काहीही निष्पन्न झालेले नाही.

रात्री धावतात रेतीचे डम्पररेतीमाफियांवर करण्यात आलेल्या कारवाईनंतरही मुंब्रा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र मांक चारवरील रस्त्यावरून रात्रीच्यावेळी रेतीची वाहतूक करणारे डम्पर पूर्वीप्रमाणेच अहोरात्र फिरत आहेत. त्यात कुठलाही खंड पडलेला नाही. झालेल्या कारवाईला ठेंगा दाखवत मुंब्रा अग्निशमन केंद्राजवळील चुहा पुलाजवळील खाडीकिनारी तसेच दिव्यातही रेती उत्खनन सुरू आहे. दिवसा रेती उत्खनन करून रात्री तिची वाहतूक करु न रेती ठिकठिकाणी पोहचवायची, यात कुठल्याही प्रकारचा खंड पडलेला नाही. येथील मुख्य रस्त्यापासून दोन ते तीन किलोमीटर दूर खाडीच्या आजूबाजूला जेसीबीच्या मदतीने खड्डे करु न काढण्यात येणारी माती आजूबाजूच्या मोकळ््या खड्ड्यात लपवून ठेवली जाते. तेथे रेती लपवून ठेवली आहे हे कळू नये यासाठी रेती लपवून खड्ड्यात पाणी सोडून ही जागा पाणठळ असल्याचे दृष्य माफिया निर्माण करतात. यामुळे पाण्याच्या खाली रेती आहे याची कल्पना येत नाही. दिवा शहरापासून मुख्य रस्त्याचे अंतर जास्त असल्यामुळे दिव्यात निघणारी रेतीही वाहतूक सुलभ आणि जलद व्हावी यासाठी चुहा पुलाजवळील खड्ड्यात लपवून ठेवली जाते. खड्ड्यातील रेती डम्परमध्ये भरल्यानंतर तो तेथून बाहेर निघताच रेती वाहून नेणाऱ्या डम्परच्या पुढे एका दुचाकीवर दोन जण निघतात. ते मुख्य रस्त्यावर येऊन कुणी अधिकारी नसल्याची खात्री करतात. त्यानंतर ते डम्पर मुख्य रस्त्यावर आणण्याचा सांकेतिक इशारा देतात.मुख्य रस्त्यावर आलेला डम्पर दुचाकी चालकाच्या मागोमाग जातो. नुकत्याच झालेल्या कारवाईनंतर सध्या हा नियम कसोशीने पाळला जातो. डम्पर कुठे खाली करायचा, तो कोणत्या रस्त्याने, कोणत्या दिशेने न्यायचा याची माहिती दुचाकी चालकाला दिलेली असते. यामुळे दुचाकीच्या मागोमाग रेतीने भरलेला डम्पर जातो. येथील खाडीतून निघणारी रेती मातीयुक्त असल्याने तिची बांधकामावर घट्ट पकड बसत नाही. यामुळे येथील रेती भिवंडीची असल्याचे भासवून तिची विक्र ी केली जाते. पूर्वीप्रमाणेच सध्याही एका डम्परसाठी सहा ते सात हजार रुपये, तसेच दाणेदार रेतीसाठी आठ ते नऊ हजार रुपये प्रती डम्पर आकारला जात असल्याची माहिती एका इमारत विकासकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. प्रशासनाने कारवाई केल्यानंतरही त्याच ठिकाणी पुन्हा रेती उत्खनन सुरु कसे होते.या सर्वसामान्य पडलेल्या प्रश्नावर पैसा सब कुछ करता है असे मिश्किल उत्तर त्याने दिले.

 

टॅग्स :thaneठाणे