नारायण जाधव ठाणे : शहरांना स्वच्छतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नगरविकास विभागाने १ ते ३१ आॅगस्ट या काळात ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ हे अभियान सुरू केले आहे. परंतु, ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या क्षेत्रात आॅगस्टचा पहिला आठवडा उलटला, तरी ही स्वच्छतेची आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेस अजून धावलेलीच नाही.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जमा होणाऱ्या घनकचºयाचे वर्गीकरण करून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करावी, यासाठी नगरविकास विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याला अनेक शहरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. काही शहरांवर अनुदानबंदीची कुºहाड उगारूनही अद्याप त्यांनी गती पकडलेली नाही.जिल्ह्यातील सहाही महानगरे अंधारातचराज्यातील महानगरांसाठी नगरविकास विभागाने १ ते ३१ आॅगस्ट या काळात ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ हे अभियान सुरू केले आहे. परंतु, त्यात पहिल्या आठवड्यात तरी राज्यासह ठाणे जिल्ह्यातील पुरस्कार मिळवलेल्या नवी मुंबई महापालिकेसह एकाही महापालिका अथवा नगरपालिकेने एकही विशेष कार्यक्रम राबवलेला नाही.काय आहे स्वच्छ आॅगस्ट क्रांती कार्यक्रम?स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपरोक्त कालावधीत दैनंदिन घनकचºयापैकी ८० टक्के निर्मितीच्या जागीच ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे, घरोघरी जाऊन १०० टक्के कचºयाचे संकलन व वाहतूक करणे, वर्गीकरण केलेल्या कचºयावर १०० टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याचा अहवाल रोज नेमलेल्या प्रशासन अधिकाºयास पाठवावा. प्रशासन अधिकाºयाने प्रत्यक्ष पाहणी करून तो अहवाल विभागीय उपसंचालक किंवा विभागीय आयुक्तांना पाठवायचा आहे. ज्या नगरपालिका या काळात उद्दिष्टपूर्ती करतील, त्यांना देण्यात येणाºया रस्ता अनुदानासह वैशिष्ट्यपूर्ण अनुदाने देण्याबाबत विचार केला जाईल.जिल्ह्यात कचराकोंडीसंपूर्ण देश २०१८ पर्यंत स्वच्छ करण्याच्या उद्देशाने देशभर २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. त्याच धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवड, भिवंडी, भुसावळ यासारख्या शहरांनी उल्लेखनीय कामगिरी करून स्वच्छतेची पारितोषिके पटकावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाहवा मिळवली. परंतु, राज्यातील ३८४ पैकी मोजक्या शहरांनी ही कामगिरी केली आहे. महापालिका आणि नगरपालिकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाºया ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भार्इंदरसह पालघरची वसई-विरार आणि रायगडची पनवेल या महापालिका आणि अंबरनाथ-बदलापूर, उरण, पेण, अलिबाग, खोपोली, महाड यासारखी शहरे अजून कचरा वर्गीकरणाच्या बाबतीत चाचपडत आहेत.या शहरांतील बहुसंख्य प्रभागांत कचºयाच्या निर्मितीच्या ठिकाणी ओले आणि सुके वर्गीकरण होत नाही. त्यावर, शास्त्रोक्त प्रक्रिया होत नाही. ठाणे महापालिकेने मागवलेल्या प्लाझ्मा तंत्रज्ञानावर आधारित कचरा विल्हेवाटीच्या कंत्राटाच्या निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात तर सारे कागदावरच आहे.येत्या काळात जाग येईल काय? : पहिला आठवडा संपला, तरी येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात नगरविकास विभागाने दिलेल्या स्वच्छ आॅगस्ट क्रांती कार्यक्रमाची एक्स्प्रेस धावेल का, असा प्रश्न आता केला जात आहे.
स्वच्छ आॅगस्ट क्रांती ‘एक्स्प्रेस’ धावणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 2:51 AM