मनीष दोंदे / खर्डीखर्डीत शांतता तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने येथे पोलीस चौकी बांधली. या पोलीस चौकीची तीन खोल्यांची इमारत १९१२ मध्ये बांधण्यात आली. एका खोलीत पोलीस कार्यालय, तर उर्वरित दोन खोल्या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी, अशी त्याची रचना होती. या पोलीस चौकीच्या इमारतीस आज १०० वर्षे झाली असली, तरी अजूनही त्याच इमारतीतून पोलीस यंत्रणा सुरू आहे. त्यामुळेच आता येथे नवीन आणि सुसज्ज इमारत बांधण्याची गरज आहे. या पोलीस चौकी क्षेत्रात एकूण २१ गावपाडे येतात. यात प्रामुख्याने खर्डी, दळखण, टेंभा, शिरोळ, दहीगाव, वरस्कोळ, उंबरखंड, अजनुप, लाहे, धामणी यासारख्या मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच या विभागात एक महाविद्यालय, दोन ज्युनिअर कॉलेज, शाळा, औद्योगिक कारखाने, गृहप्रकल्प, दोन जलाशय आहेत. यामुळे येथे शांतता तसेच सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी या चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांवर असल्याने कामाचा मोठा ताण येथे आहे. भौगोलिकदृष्ट्या मोठ्या तसेच किचकट जंगलपट्टीच्या भागात या चौकीत केवळ सहा पोलीस कर्मचारी शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करीत आहेत.
खर्डीकरांना सुसज्ज पोलीस चौकी कधी मिळणार?
By admin | Published: January 24, 2017 5:24 AM