डोंबिवली : मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष तसेच ZRUCC मेंबर मधु कोटियन यांनी रेल्वेला विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.
विनातिकीट आणि अवैध प्रवाशांकडून आता पर्यंत १०१ कोटींच्यावरती वसुली केली आहे. परंतु ३ हजार प्रवाशांच्या ट्रेनसाठी ७-८ हजार प्रवासी कोंबून १० हजार तिकीट वाटण्याचा अधिकारच रेल्वेला कोणी दिला? कुठल्याही सेवेला मर्यादा असतात. तसेच त्या सेवेवर कमावण्याच्या मर्यादा सुद्धा आखून दिल्या पाहिजेत, असे कोटियन यांनी सांगितले.
कल्याण कसारा लोकल आणि लांबपल्याच्या गाड्या!!गेले अनेक वर्षे कल्याण कसारा लोकलप्रवाशांवर अन्याय चालुच आहे. प्रत्येक वेळी नवीन लांब पल्यांच्या गाड्या सुरु केल्यामुळे त्यांचा परिणाम लोकल सेवेवर पडत आहे. सकाळच्या वेळेस लोकल सेवेला प्राधान्य द्यावे ही मागणी वेळोवेळी दुर्लक्षित करण्यात येत आहे.एलफिन्स्टन दुर्घटनेतुन काय शिकलो? फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि अधिकाऱ्यांची भ्रष्ट्राचाराची परंपरा कायम असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एल्फिस्टन दुर्घटना झाली तिकडुन हाकेच्या अंतरावर असलेल्या "दादर" स्टेशनला स्थानिक गुडांनी राजकिय आश्रयाखाली संपुर्णपणे कब्जा केलेला आहे. सर्व प्रमुख राजकीय पक्षांची कार्यालये असुनही त्यांना "हप्तेखोरांवर" नियंत्रण ठेवता येत नाही हे वास्तव आहे. कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, ठाणे, कळवा ,मुंब्रा , डोंबिवली, कल्याण , बांद्रा, अंधेरी, बोरीवली सगळीकडेच हप्तेबाजी सुरू आहे. कळवा पुर्वेत तर तक्रार करूनही कारवाई होत नाही. ह्यातच राजकीय पाठबळ अधोरेखित होते. रेल्वे दाखवण्यापुरती कारवाई करत असल्याची आकडेवारी दिलेली आहे. पण पालिका खाते बंद करण्यास तयार नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
ठाणेपल्याड अपघात कधी थांबणार?रेल्वेचे या प्रश्नावरचे उत्तर अतिशय हास्यास्पद आहे. कळवा - मुंब्रावासियांना ट्रेनमध्ये चढणे अशक्य आहे हे वास्तव रेल्वे नेहमीच नाकारत आलेली आहे. पारसिक स्टेशन आणि पारसिक बोगद्याबद्दलचा प्रश्न सुद्धा रेल्वे टाळत आहे. एकीकडचे अपघात कमी करण्यासाठी ५-६ वा ट्रॅक, कळवा ऐरोली लिंक सारखे प्रकल्प राबवत आहोत हे सांगत आहे. तर दुसरी कडे हे प्रकल्प MRVC करत असल्याचे सांगून हात झाडत आहे. अनधिकृत व्होट बँक वाचवण्यासाठी राजकीय नेतृत्व रेल्वे प्रवाशांचा जीव घेत आहे आणि प्रशासन राजकीय दबावाखाली नमत असल्याचे चित्र अत्यंत क्लेशदायक आहे.
मेट्रोप्रमाणेच एण्ट्रिलाच प्रवास्यांना RDFR तिकिट प्रणाली मुंबईत अावश्यक झाली अाहे. सगळ्यात जास्त अपघात सकाळच्या ८.३० ते ११.००ह्या वेळेस होत अाहेत , ह्या गर्दिच्या वेळेस फक्त पास धारकांनाच रेल्वे स्टेशनला एण्ट्रि दिल्यास नक्कीच फरक पडेल. त्यामुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल तसेच अपघातहि कमी होतील. कळवा , दिवा फाटकावरील पुल, कळवा ऐरोली लिंक, CBCT यंत्रणा, ५-६ ट्रॅक हे प्रकल्प राजकिय स्वार्थ बाजुला ठेवुन पुर्ण करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.