शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, द्विशतक ठोकत 212 जागांवर घेतली आघाडी; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र
2
Maharashtra Assembly Election Results : सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर!
3
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर
7
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण?
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुती-महाविकास आघाडीत ‘काँटे की टक्कर’; भाजपाला सर्वाधिक आघाडी, मनसेची स्थिती काय?
9
Jogeshwari Vidhan Sabha Election Results 2024 : जोगेश्वरीत रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आघाडीवर, सुरुवातीच्या कलात महायुतीची जोरदार मुसंडी
10
Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यातील कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर, केदार दिघे पिछाडीवर…
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अजित पवारांची घरवापसी? उद्धव ठाकरे भाजपासोबत? महाराष्ट्रात सरकार स्थापनेची ५ समीकरणे
12
कोकणात राणे बंधुंपैकी एक आघाडीवर, एक पिछाडीवर; सिंधुदूर्गचा कल कोणाकडे....
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत खल्लास! टीम इंडियाला मिळाली अल्प आघाडी
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights :भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं
15
शेअर बाजारात ५ महिन्यांचा उच्चांक; गुंतवणूकदारांनी ७.१५ लाख कोटी कमावले
16
अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर
17
झारखंडमध्ये एनडीए आणि ‘इंडिया’त टफफाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय असं चित्र
18
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर दक्षिणमध्ये मोठी घडामोड, अमल महाडिक २०१२ मतांनी आघाडीवर; कोण मारणार बाजी ?
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 बविआला राडा भोवणार! नालासोपाऱ्यात भाजपाचा उमेदवार आघाडीवर, क्षितिज ठाकूरांचा गेम होणार? 

अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 8:55 PM

Akshay Shinde encounter : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी आत्म संरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, चकमकीची ही घटना कुठे घडली याबद्दल माहिती समोर आली आहे. 

Akshay shinde encounter Inside : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. ट्रान्झिट रिमांड घेतल्यानंतर त्याला घेऊन जात असताना ठाणे जिल्ह्यात ही घटना घडली. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसाची रिव्हॉल्व्हर घेऊ गोळीबार केला. त्यानंतर आत्म सरंक्षणार्थ केलेल्या गोळीबारात शिंदे जखमी झाला आणि रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. (how akshay shinde died in police firing?)

अक्षय शिंदेला कोणत्या प्रकरणात ट्रान्झिट रिमांडवर घेतले होते?

अक्षय शिंदे हा तळोजा तुरुंगात होता. तळोजा तुरूंगातून त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी पोलीस घेऊन जात होते. 

अक्षयच्या दुसऱ्या पत्नीने कलम ३७७ अन्वये अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप केला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा बदलापूर पूर्वमध्ये हा गुन्हा वर्ग करण्यात आला. 

या गुन्ह्याच्या अधिक चौकशीसाठी बदलापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक तळोजा तुरुंगात अक्षय शिंदेचा ताबा घेण्यासाठी आले होते.

तळोजा तुरंगातून निघाल्यानंतर काय घडले?

सोमवारी (२३ सप्टेंबर) सायंकाळी ५.३० वाजता बदलापूर पोलिसांचे पथक तळोजा तुरुंगात गेले आणि त्यानंतर अक्षय शिंदेला ताब्यात घेतले. त्यानंतर ते तळोजा तुरुंगातून बाहेर पडले. मुंब्रा-कळवा बायपासवर व्हॅनमध्ये असताना अक्षय शिंदेने एपीआय मोरेंच्या कमरेला असलेली रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. त्यानंतर पोलिसांवर हल्ला केला. 

अक्षय शिंदे गोळीबार करायचे थांबत नसल्याने पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला मुंब्रा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अक्षय शिंदे मृत्यू; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितले?

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "त्याच्या (अक्षय शिंदे) पूर्व पत्नीने लैंगिक अत्याचाराची एक तक्रार केली. त्यासंदर्भात चौकशी करण्याकरिता नेण्यात येत होते. त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केला. पोलिसांवर आणि हवेत गोळीबार केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी चालवली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. अधिकृत घोषणा करायची आहे पण, जी काही माहिती आहे, त्याप्रमाणे बहुदा मृत्यू झाला असावा. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेला हा गोळीबार आहे, ज्यात आरोपीचा मृत्यू झालेला आहे."

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस