भिवंडी: राज्य सरकारकडून प्लास्टिक बंदीची घोषणा केली असताना चोरी छुपे प्लास्टिक कंपन्यांतून उत्पादन होत असल्याने बाजारात प्लास्टिकच्या पिशव्या दिसून येतात. याचा मागोवा घेत तालुका पोलीस ठाणे व महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने संयुक्तीक कारवाई करीत तालुक्यातील सोनाळे गावातील प्लास्टिक कंपनीवर आज बुधवारी दुपारी छापा टाकून तब्बल तीन टन पिशव्यासह कच्चा माल प्रदुषण विभागाने जप्त केला.तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राजराजेश्वरी बजाज कंपाऊण्ड येथे निशांत जैन यांची मे.चिंटू प्लास्टिक व सागर जैतावकर यांची मनोरमा इंटरप्रायझेस या प्लास्टिक पिशव्या तयार करण्याच्या कंपन्या सुरू होत्या. शासनाने पन्नास मायक्रोनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या उत्पादनास बंदी केली असताना या दोन्ही कंपनीत राजरोसपणे पिशव्याचे उत्पादन सुरू होते. या पिशव्या किरकोळ दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांकडे उपलब्ध दिसुन येत होत्या. याची माहिती तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळाली. पोलीसांनी खात्री करून या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाला माहिती दिली. या दुपारी प्रदुषण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी शरद पवार व तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विलास चौघुले यांनी आपल्या पथकासह संयुक्त कारवाई केली. सोनाळे येथील अनाधिकृत सुरू असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा कंपनीवर छापा टाकून कंपनीतून तीन हजार किलोहून अधिक प्लास्टिक पिशव्या व कच्चा माल प्रदूषण विभागाने जप्त केला. तसेच या कंपनीकडे प्रदूषण नियंत्रण विभागाचा कोणताही परवाना नसल्याची माहिती प्रदूषण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी शरद पवार यांनी दिली. पुढील कारवाई प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून होणार असुन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी कंपनी मालकांवर फौजदारी कारवाई व्हावी,अशी मागणी शहरातील पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
प्लास्टिक पिशव्यांना बंदी असताना भिवंडीत राजरोसपणे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 8:58 PM
भिवंडी : राज्य सरकारकडून प्लास्टिक बंदीची घोषणा केली असताना चोरी छुपे प्लास्टिक कंपन्यांतून उत्पादन होत असल्याने बाजारात प्लास्टिकच्या पिशव्या दिसून येतात. याचा मागोवा घेत तालुका पोलीस ठाणे व महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने संयुक्तीक कारवाई करीत तालुक्यातील सोनाळे गावातील प्लास्टिक कंपनीवर आज बुधवारी दुपारी छापा टाकून तब्बल तीन टन पिशव्यासह कच्चा माल ...
ठळक मुद्देदोन कंपनीत राजरोसपणे पिशव्याचे उत्पादनतीन टन पिशव्यासह कच्चा माल जप्तप्रदूषण नियंत्रण विभागाचा परवाना नाही