डोंबिवली - एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वाने लक्ष दिल पाहिजे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोंबिवली ही सासुरवाडी आहे, त्यांनी ती सांभाळायाला हवी, असा टोला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी माजी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. आज सकाळपासूनच सेनेतील दोन गटात शाखा ताब्यात घेण्यावरून वाद सुरु होता. यावर आमदार पाटील यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे भाष्य केले. गुरुवारी सकाळीच शहरातील शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्याच्या मुद्यावर उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट पुन्हा आमनेसामने आल्याचे पहायला मिळाले. कायदेशीर बाबी पूर्ण करून शिंदे गटाने आपल्या ताब्यात शाखा घेतली आहे. यावर आमदार पाटील यांना विचारले असता त्यांनी तो त्या दोन गटांचा विषय आहे. शाखा कोणाच्या ताब्यात असायला पाहिजे, नसायला पाहिजे तो त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. मला वाटतं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोंबिवली ही सासुरवाडी आहे, त्यांनी संभाळायला पाहिजे. एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वाने देखील लक्ष दिले पाहिजे. कार्यकर्ता म्हणून ही भावना मांडतोय मी. बाकी माझा तसा त्या काही गोष्टीशी संबंध नाही जे चाललंय ते त्यांच्या त्यांना लखलाभ असो. अशा शब्दात पाटील यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.
एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वानेही लक्ष दिले पाहिजे, मनसेचे आमदाराचा उद्धव ठाकरेंना टोला
By प्रशांत माने | Published: October 27, 2022 9:48 PM