शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आंतरराष्ट्रीय मुंब्रा स्टेडियम ठरतेय पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:17 AM

ठाण्याच्या राजकारणात भाजपाला धक्का देत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र आणण्याचे निमित्त ठरलेले मुंब्रा-कौसा भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम सध्या दुरवस्थेच्या वादळात गटांगळ्या खात आहे.

ठाण्याच्या राजकारणात भाजपाला धक्का देत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र आणण्याचे निमित्त ठरलेले मुंब्रा-कौसा भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम सध्या दुरवस्थेच्या वादळात गटांगळ्या खात आहे. अशा स्टेडियमसाठी काही वर्षापूर्वी आवाज उठवण्यात आला. त्यानंतर कौसा भागात १८ एकर परिसरात ते उभारण्याचे निश्चित झाले. त्यानुसार मागीलवर्षी झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या लगीनघाईत या स्टेडियमचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला. परंतु अवघ्या एका वर्षातच स्टेडियमची पुरती लया गेली असल्याचे विदारक वास्तव ‘रिपोर्टर आॅन दि स्पॉट’च्या निमित्ताने समोर आले आहे. तब्बल ४० कोटींचा खर्च करुनही केवळ देखभाली अभावी हे स्टेडियम दादोजी कोंडदेव क्रीडागृहासारखेच पांढरा हत्ती ठरणार का? अशी देखील शंका आतापासूनच उपस्थित होऊ लागली आहे. त्यामुळे या स्टेडियमला येत्या काळात उर्जा दिली गेली नाही तर मात्र या ठिकाणी स्टेडिअम होते अशी म्हणण्याची वेळ मुंब्राकरांवर किंबहुना ठाणेकरांवर आल्याशिवाय राहणार नाही.ठाण्यात यापूर्वी दादोजी कोंडदेव क्रीडागृह उभारण्यात आले. या क्रीडागृहात क्रिकेटपेक्षा इतर कार्यक्रमच अधिक होत असल्याने या क्रीडागृहाच्या वापरावरुन प्रश्नचिन्ह निर्माण झाले. परंतु आता याठिकाणी इतर सर्व प्रकारचे खेळ बंद करून याठिकाणी पुन्हा एकदा रणजी सामने खेळवण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी येथील अ‍ॅथलेटिक्स आणि इतर खेळांना तिलांजली दिली जाणार आहे. यातून केवळ या स्टेडियमची पांढरा हत्ती अशी असणारी ओळख पुसण्याचा पालिकेचा प्रयत्न राहणार आहे. आता त्यात पालिकेला कितपत यश येते हे येणारा काळच ठरवणार आहे. परंतु इतर खेळ बंद होत असल्याने येथे येणाºया खेळांडूची निराशा झाली असून त्यांनी पालिकेच्या या निर्णयाविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. परंतु या स्टेडियमची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने त्याची देखील लया गेली आहे. दुसरीकडे ढोकाळी येथे देखील शरद पवार यांच्या नावाने मिनी क्रीडासंकुल उभारण्यात आले आहे. परंतु ते देखील निवडणुकीच्या लगीनघाईत सुरु करण्यात आले होते. आज त्याठिकाणी किती खेळ होतात, याबाबत प्रश्नचिन्ह असले तरी निगा देखभालीअभावी या स्टेडियमची देखील अवस्था फारशी चांगली नाही.पालिकेकडे स्टेडियमच्या बाबतीत हे दोन अनुभव गाठीशी असतानाही पालिकेने शहरातील खेळाडूंना आंतरराष्टÑीय पातळीवरील प्रशिक्षण मिळावे, सर्व प्रकारचे खेळ हे एकाच छताखाली खेळवले जावेत या उद्देशाने कौसा भागात आंतरराष्टÑीय दर्जाचे स्टेडियम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २००९ -१० च्या सुमारास या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर खºया अर्थाने या स्टेडियमच्या कामाला सुरूवात झाली. १८ एकर परिसरात स्टेडियमची उभारणी करण्यात आली असून त्यावर ४० कोटींचा खर्च झाला. तीन वर्षापूर्वीच हे स्टेडियम तयार झाले. ते खेळाडूंची प्रतीक्षा करत आहे. किरकोळ कामे शिल्लक असल्याने या स्टेडियमचा लोर्कापण सोहळा होत नव्हता. अखेर ठाणे महापालिका निवडणुकीच्या आधी गेल्यावर्षी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते घाईगडबडीत त्याचे लोर्कापण करण्यात आले. या सोहळ्यातही शिवसेना आणि राष्टÑवादीमध्ये श्रेयाची लढाई दिसून आली होती.वर्ष उलटण्याआधीच या स्टेडियमची पुरती रया गेल्याची गंभीर बाब नुकतीच महासभेत उघड झाली. या ठिकाणी अनेक सोई सुविधांची वानवा असल्याचे मत व्यक्त करून राष्टÑवादीच्या नगरसेवकांनी महासभेत हंगामा केला होता. प्रत्यक्षात आता पाहणी केल्यानंतर करण्यात आलेला हा दावा तंतोतंत खरा ठरला आहे. आंतरराष्टÑीय दर्जाचे स्टेडियम असतानाही याठिकाणी अनेक सुविधांची वानवा असल्याचे चित्र दिसून आले. पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहाची साधी सुविधा देखील उपलब्ध नाही. स्वच्छतागृह आहे, पण पाणी नाही, पिण्याच्या पाण्याची वाहिनीच टाकण्यात आलेली नाही. विजेचीही नीट व्यवस्था नाही. अनेक ठिकाणी जळमटे बसली आहेत. अ‍ॅथेलिट ट्रॅकचा वापरही कशाही पध्दतीने होताना दिसतो. साफसफाई, झाडू आदींसह इतर सर्वच सोई सुविधांच्या बाबतीत स्टेडियम सपशेल फेल ठरले आहे. त्यामुळे स्टेडियम असून खोळंबा अशी म्हणण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे.खेळाडू घडणार तरी कसे?केंद्र सरकार एका बाजूला खेळण्यासाठी प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे आहे ती मैदाने, क्रीडा संकुलांची दुरवस्था झाली आहे. मग अशा परिस्थितीत खेळाडू घडणार तरी कसे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. चांगले खेळाडू घडवण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय इच्छशक्ती हवी. पण त्याचाच नेमका आपल्याकडे अभाव पाहायला दिसतो.मी ठाण्यात वास्तव्यास असूनही रोज या ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकला येतो. परंतु पालिकेने नेहमीच मुंब्य्राला सापत्न वागणूक दिली आहे. हे या स्टेडियमकडे पाहिल्यास लक्षात येते. हे स्टेडियम सर्व खेळांसाठी खुले व्हावे, इतर भागातून देखील खेळाडू येथे सराव आणि खेळण्यासाठी यावे यासाठी पालिकेकडे पाठपुरावा सुरु आहे.- जितेंद्र आव्हाड, आमदारसुविधांची वानवा असल्यानेच महासभेत आवाज उठविण्यात आला होता. आता तरी प्रशासन या निमित्ताने जागे होईल अशी आशा आम्ही बाळगतो.- अशरफ पठाण, नगरसेवक

टॅग्स :thaneठाणे