भातसानगर - शहापूर तालुक्यात प्रथमच घेतल्या गेलेल्या पांढºया कांद्याचे पहिल्याच प्रयत्नात विक्रमी उत्पादन घेऊन एका शेतकºयाने वेगळा उपक्र म राबवत आदर्श निर्माण केला आहे.तालुक्यातील खरिवली या गावातील शेतकरी नेहमीच भातसा कालव्याच्या पाण्यावर अनेक प्रकारच्या भाज्या तसेच भातशेतीचे उत्पादन घेत असतात. येथीलच स्वामी विशे हे आपल्या शेतीत नेहमीच काही ना काही प्रयोग करत असतात. यासाठी ते नेहमी तालुका कृषी अधिकाºयांकडून मार्गदर्शनदेखील घेत असतात.तीन एकर जागेत लावलेल्या आंब्याच्या बागेत एखादे आंतरपीक घेता येईल का, याचा विचार त्याने केला आणि तालुक्यात कधीही न पिकवलेला पांढरा कांदा विक्रमी उत्पादन देऊन गेला. याबरोबरच त्यांनी लाल कांद्याचे उत्पादनही घेतले आहे. आजपर्यंत खर्च वजा जाता त्यांना अडीच लाखांचा नफा मिळाला. तसेच कलिंगडाच्या एकाच वेलीवरून ठिबकच्या साहाय्याने तीन वेळा उत्पादन घेत आहे. या सर्व उत्पादनांची ते स्वत:च बाजारात विक्री करत असल्याने त्यापासूनही त्यांना लाख ते सव्वा लाख इतके उत्पन्न मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे.आजपर्यंत आठ टन माल निघाला असून चार टन मालाची विक्री झाली आहे. या आंब्याच्या जागेतील कलिंगडाचे अंतर्गत पीक हे १२ टनापर्यंत निघेल, असा त्यांचा अंदाज आहे.तालुक्यात कुठेही पांढºया कांद्याचे उत्पादन घेतले जात नसतानाही या शेतकºयाने केलेला हा प्रयोग वाखाणण्याजोगा आहे. शिवाय, कलिंगडाचे अंतर्गत पीक घेऊन त्यांनी इतर शेतकºयांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. त्यांना शेतीसाठी आवश्यक असणाºया शासकीय सुविधा दिल्या असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत आहोत.- विलास झुंजारराव, तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती, शहापूरतालुक्यात शेतीच्या बाबतीत अनेक प्रयोग केले जात असून ते यशस्वी होत आहेत. याचे खरोखरच कौतुक वाटते.- वंदना भांडे, जि.प. सदस्या
शहापूर तालुक्यात पांढऱ्या कांद्याचे पीक, पहिलाच प्रयोग ठरला यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 6:19 AM