शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

घोडबंदरचा शिलेदार कोण?

By admin | Published: January 11, 2017 7:22 AM

ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर हा नव्याने विकसित झालेला पट्टा. तेथील पांढरपेशा, उच्चभ्रू मतदारांमुळे या पट्ट्याला

अजित मांडके / ठाणेठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर हा नव्याने विकसित झालेला पट्टा. तेथील पांढरपेशा, उच्चभ्रू मतदारांमुळे या पट्ट्याला प्रत्येक निवडणुकीत अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने-शिवसेनेला कडवी झुंज दिली. निसटत्या विजयावर शिवसेनेला समाधान मानावे लागले. विधानसभेतील भाजपाची ही कडवी झुंज आता ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतही पाहायला मिळेल. ओवळा - माजिवडा या मतदारसंघातील काही भाग ठाणे, तर काही भाग मीरा-भाईंदर महापालिकेत जात असला तरी ठाण्याच्या भागातही भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आताच्या घडीला बदललेल्या राजकीय समीकरणांचा आणि प्रभाग रचनेचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे येथे फारसे कडवे आव्हान दिसून येत नाही. नव्या समीकरणांचा विचार करून येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांना येथे भाजपाचे संजय पांडे यांनी कडवी झुंज दिली होती. सरनाईक यांना ६८ हजार ५७१ मते मिळाली, तर पांडे यांना फारसा प्रभावी प्रचार न करता ५७ हजार ६६५ मते या भागातून मिळाली होती. पहिल्या १७ फेऱ्यापर्यंत पांडे आघाडीवर होते. वर्तकनगर भागातील पेट्या उघडण्यात आल्या आणि तेथूनच सरनाईक यांनी आघाडी घेतली. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला काँटे की टक्कर दिली होती. राष्ट्रवादीचे हणमंत जगदाळे यांना २० हजार ६८६, मनसेचे सुधाकर चव्हाण यांना २० हजार ५६८ आणि कॉंग्रेसचे प्रभात पाटील यांना १३ हजार ५८९ मते मिळाली होती.विधानसभा निवडणुकीत घोडबंदर पट्ट्यात भाजपाचा वरचष्मा दिसून आला. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासह कॉंग्रेस आणि शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपात प्रवेश केला. २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत येथून २४ नगरसेवक निवडून आले होते. त्यात शिवसेनेचे १५, मनसेचे दोन, तीन जागांवर अपक्ष, दोन जागांवर राष्ट्रवादी आणि एका जागेवर कॉंग्रेसने विजय मिळविला होता. आता ही परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेला येथे पोषक वातावरण असले, तरी भाजपाने विधानसभा निवडणुकीत ज्या पध्दतीने मुसंडी मारली होती ते पाहता येत्या ठाणे पालिका निवडणुकीतही भाजपा येथे करिष्मा दाखविणार हे नक्की. येथील मतदारांचा वर्गही बदलला आहे. पूर्वी हा पट्टा आगरी कोळ्यांचा म्हणून ओळखला जात असे. गेल्या काही वर्षात येथील रस्त्यांचे जाळे मोठे झाले आणि नवनवीन गृहसंकुले उभी राहिली. त्यामुळे उच्च्भ्रू, मध्यमवर्गीय मतदारांचे प्रमाण वाढत गेले. एका जातीचे परंपरागत वर्चस्व उरले नाही. आजवरची मते जरी शिवसेनेच्या पारड्यात पडली, तरी नव्या मतदारांचा कौल निर्णायक ठरू शकतो. त्यामुळेच आता येथील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ओवळा माजिवड्यात सेना - भाजपा टक्करच्भाजपाने दिव्याबरोबरच घोडबंदर भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेला लढत देऊ शकतील, असे तगडे उमेदवार भाजपाकडेही आहेत. त्यामुळे येथे शिवसेना विरुध्द भाजपा या लढतीतील चुरस दिसून येईल.च्विधानसभा निवडणुकीत सेनेचे प्रताप सरनाईक यांना येथे भाजपाचे संजय पांडे यांनी कडवी झुंज दिली होती. सरनाईक यांना ६८ हजार ५७१ मते मिळाली, तर पांडे यांना फारसा प्रभावी प्रचार न करता ५७ हजार ६६५ मते येथून मिळाली होती. पहिल्या १७ फेऱ्यापर्यंत पांडे आघाडीवर होते. वर्तकनगर भागातील पेट्या उघडल्या आणि सरनाईक यांनी आघाडी घेतली.