शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

ठाणे ग्रामीणमधील अवैध धंद्यांसह गुन्हेगारांना वेसण घालणार- शिवाजी राठोड

By जितेंद्र कालेकर | Published: August 03, 2018 11:30 PM

पोलीस-जनता यांच्यात सुसंवाद निर्माण करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही ठाणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी शुक्रवारी दिली. ठाण्याची सूत्रे घेतल्यानंतर ‘लोकमत’शी मनमोकळेपणाने बातचीत करताना त्यांनी हा मानस व्यक्त केला.

ठळक मुद्देकौटुंबिक मेळाव्यात तणाव दूर करणारनागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणार ठाणे पोलीस अधीक्षकपदाची घेतली सूत्रे

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे ग्रामीण भागातील अवैध धंदे आणि कुख्यात गुन्हेगारांचा बीमोड केला जाईल. कामात कुचराई करणाऱ्या पोलिसांवर प्रसंगी कारवाई केली जाईल. पोलीस-जनता यांच्यात सुसंवाद निर्माण करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही ठाणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी शुक्रवारी दिली. ठाण्याची सूत्रे घेतल्यानंतर ‘लोकमत’शी मनमोकळेपणाने बातचीत करताना त्यांनी हा मनोदय व्यक्त केला.डॉ. राठोड हे यापूर्वीही २००९ ते २०११ या कालावधीमध्ये ठाणे मुख्यालयात होते. २०११ ते २०१४ या काळात उल्हासनगरच्या उपायुक्तपदी त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. त्यावेळी पप्पू कलानी यांना त्यांनी निवडणूक काळात अटकही केली होती. वेळ आणि शिस्तीचा लातूरमध्ये अधीक्षकपदी दबदबा निर्माण केलेल्या डॉ. राठोड यांनी मराठा मोर्चा आंदोलनासह अनेक प्रकरणे कौशल्याने हाताळली. अविनाश चव्हाण या खासगी क्लासचालकाच्या खून प्रकरणाचा २४ तासांतच छडा लावून आठ जणांना अटक केली. ‘मनोमिलन’ या अनोख्या उपक्रमांतर्गत भांडणामुळे विभक्त होण्याच्या वाटेवर असलेल्या सुमारे एक हजारांपेक्षा अधिक दाम्पत्यांचा संसार त्यांनी गेल्या तीन वर्षांत नव्याने फुलवला. स्वत: गायक असल्यामुळे महंमद रफी यांच्या आवाजातील ‘बहारों फुल बरसाओ...’ हे गाणे ते ‘मनोमिलना’च्या उपक्रमात गाऊन अशा जोडप्यांना त्यांच्या विवाहाच्या प्रसंगाची आठवण करून देत असल्याचेही त्यांनी सांगितले. गायनाच्या आवडीमुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांनी एक सांस्कृतिक व्यासपीठ तयार केले. पोलीस स्रेहमेळाव्यातून स्वत: गाणी गात असल्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा कामावरील ताणतणाव आपोआपच दूर होत असल्याचे ते विश्वासाने सांगतात.चुकून घडलेल्या गुन्ह्यांमुळे एखाद्याला शिक्षा झाल्यानंतर शिक्षा भोगून आलेल्या व्यक्तीचे ‘परिवर्तन’ या कार्यक्रमात मनोगत ठेवून इतरांनी अशा गुन्ह्यांकडे न वळण्यासाठी प्रेरित केले जाते. बळीराजा सबलीकरण या मोहिमेंतर्गत लग्न किंवा इतर कार्यक्रमात डॉल्बी वाजवण्याला बंदी आणून तोच खर्च शेतकºयांच्या मदतीसाठी दिला. लातूरमध्ये अशी २५ लाखांची मदत लोकांनी करण्यासाठी त्यांचे मन वळवल्याची आठवणही त्यांनी सांगितली.ठाण्यातील अवैध धंदे आणि गावठी दारूविरुद्धची मोहीम यापुढेही अशाच प्रकारे व्यापकपणे चालू ठेवणार आहे. कुख्यात गुन्हेगारांवर मकोका आणि हद्दपारीची कारवाई करणार आहे. आरोपी दत्तक योजनेंतर्गत एक पोलीस एका आरोपीच्या हालचालींवर नजर ठेवेल. पोलीस आणि जनता संबंध दृढ करण्यावर भर देणार असून पोलीस ठाण्यात येणाºया प्रत्येकाचे समाधान करण्याच्या सूचनाही देण्यात येतील. त्यातून पोलिसांचीही प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. शून्य पेंडन्सीद्वारे गुन्हे आणि अर्ज निकाली काढण्यावरही भर देणार असून गैरकृत्य आणि कामात कुचराई करणाºया पोलिसांवर तसेच अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.....................रोज १० किलोमीटर चालणेगायनाची आवड असलेल्या डॉ. राठोड यांना चालण्याचीही आवड असून ते रोज १० किलोमीटर नियमित चालत असल्याचे सांगतात. गेल्या आठ वर्षांमध्ये यात खंड झालेला नसून चालण्यामुळे शरीरही तंदुरुस्त राहते. त्यामुळे ठाण्यातील पोलिसांमध्येही ही सवय आपण रुजवणार असल्याचे ते म्हणाले.............................दरम्यान, मावळते अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी ठाण्याची सूत्रे डॉ. राठोड यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सूत्रे घेतली. ठाणे ग्रामीणच्या जनतेचे चांगले सहकार्य लाभले. ठाण्यात अवैध गावठी दारु बंदीबरोबरच अनेक क्लीष्ट गुन्हयांचा छडा लावल्याचे समधान असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसTransferबदली