शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

पुढचा पंतप्रधान कोण असेल? बावनकुळे पोहोचले थेट दुकानात, महिलेने सांगितले चुलीवरची लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 9:52 AM

‘लोकसभा प्रवासा’अंतर्गत भाजपचे शक्तिप्रदर्शन : साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नवरात्रानिमित्त ठाण्यातील बाजारपेठेत तुफान गर्दी झालेली असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्यासोबत किमान दोनेकशे भाजप कार्यकर्ते मंगळवारी ठाण्यातील वेगवेगळ्या दुकानांत शिरून व्यापारी, कर्मचारी, ग्राहक यांना गाठून ‘तुम्हाला देशाच्या पंतप्रधानपदी कोण हवंय’, असा सवाल करीत होते. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तोंडावर बावनकुळे यांचेच मुखवटे परिधान केले असल्याने एकाचवेळी मूळ बावनकुळे व त्यांचे पन्नासेक मुखवटाधारी यांच्या प्रश्नाला आपसूक ‘नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान हवे’ हे उत्तर मिळत होते. मात्र मोदीच का हवे, या बावनकुळेंच्या प्रश्नावर अनेकांची गाडी अडत होती. मात्र नरेंद्र मोदी यांना ठाण्यातील बाजारपेठेत मिळालेला हा उदंड पाठिंबा पाहून बावनकुळे हे आनंदून गेले.

नवरात्रीनिमित्त ठाण्यातील बाजारपेठेत सध्या खूप गर्दी होते. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील महिला फुले व अन्य पूजेचे साहित्य विकण्याकरिता कुटुंबकबिल्यासह ठाण्यात दाखल झाल्या आहेत. त्यातच रिक्षा, स्कूटर, मोटारी बाजारपेठेतून जात असल्याने अक्षरश: मुंगीलाही पाऊल ठेवायला बाजारपेठेत जागा नसते. त्याचवेळी बावनकुळे आपल्या २०० ते ३०० कार्यकर्ते, पदाधिकारी यांना घेऊन या गर्दीत दाखल झाले. बावनकुळे यांच्या हातात वाहिनीच्या पत्रकारासारखा माइक होता.  बावनकुळे यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना मात्र अनेकांची भंबेरी उडाली.

बाजारपेठेत प्रत्येकाला पंतप्रधानपदाबाबत जनभावना समजावी याकरिता माइक स्पीकरला जोडला होता. बावनकुळे एका दुकानात गेले. तेथे ग्राहकांची गर्दी होती. त्या गर्दीतून वाट काढत ते गल्ल्यावरील दुकान मालकांपर्यंत गेले व त्यांनी माइक पुढे करून त्यांना तुम्हाला पंतप्रधानपदी कोण हवे, असा थेट सवाल केला. गल्ल्यातून मान वर करून पाहिलेल्या शेठला समोर खुद्द बावनकुळे दिसताच त्याने नरेंद्र मोदीच हवे, असे सांगितले. 

हातामधील पिशव्या सावरत बाजारपेठेतून वाट काढणाऱ्या ग्राहकांनाही बावनकुळे यांनी तोच प्रश्न केला. जवळपास सर्वांनी नमो नमो केले. भाजपच्या महाविजय २०२४ अभियानांतर्गत लोकसभा प्रवास योजनेंतर्गत बावनकुळे यांच्या दौऱ्याची भाजपने जोरदार तयारी केली होती. बाजारपेठ, मुख्य चौकात फलकबाजी करण्यात आली होती. बावनकुळे यांनी गडकरी रंगायतन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

त्यानंतर त्यांनी ठाण्यातील तहसील कार्यालय ते जांभळीनाकापर्यंत व्यापारी, भाजी विक्रेते, ग्राहक यांच्याशी संवाद साधला. एका व्यापाऱ्याने पुढील १०० वर्षे आम्हाला मोदीच पंतप्रधान हवेत असे सांगत जय श्रीरामची घोषणा दिली. मोदी का हवेत, या बावनकुळे यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना मात्र अनेकांची भंबेरी उडाली. एका महिलेने मोदीच का? या प्रश्नावर समाधानकारक उत्तर न सुचल्याने जो आमची कामे करेल त्यांना आम्ही निवडून देऊ, असे म्हणत बावनकुळे यांच्या प्रश्नाचे उत्तर टाळले.

चुलीवरील जेवणाची लाभार्थ्यांकडून कबुलीभाजपच्या काही कार्यकर्त्यांनी लाभार्थी म्हणून येऊरच्या आदिवासी महिलांना बोलावले होते. बावनकुळे यांची प्रतीक्षा करत या महिला सावलीमध्ये उभ्या होत्या. महिलांच्या हाती ‘मी लाभार्थी’ अशा आशयाचे फलक दिले होते. या विषयी महिलांना विचारले असता, त्यांना आपण कसले ‘लाभार्थी’ आहोत याचे उत्तर देता आले नाही. एका महिलेने  आता सिलिंडरचा परवडत नसल्या जेवण चुलीवरच बनवत असल्याचे सांगितले.

रॅलीमुळे वाहतूककोंडीभाजपच्या या रॅलीमुळे बाजारपेठेतील बसची वाहतूक तलवापाळी मार्गे वळविली होती. त्यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा