केंद्र सरकार अर्णब गोस्वामींवर मेहरबान का?; उल्हासनगरमध्ये काँग्रेसचं जोडो मारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 05:33 PM2021-01-22T17:33:29+5:302021-01-22T17:33:42+5:30
उल्हासनगर काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली नेहरु चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
उल्हासनगर : देशाच्या सुरक्षा विषयी रिपब्लिकन भारत न्यूज चॅनलच्या संपादक अर्णव गोस्वामी यांच्या पोरखेळाच्या निषेधार्थ शहर काँग्रेसने नेहरू चौकात जोडो मारो आंदोलन केले. देशाची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या गोस्वामीवर कारवाईची मागणी करण्यात आली.
उल्हासनगर काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली नेहरु चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. रिपब्लिक भारत न्यूज चॅनलचे संपादक अर्णव गोस्वामी याच्या प्रतीमेला जोडे मारत मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. पूछता है भारत, जबाब दो. या घोषणेने संपुर्ण परिसर दणाणला होता. देशाच्या सुरक्षेचा विषय असताना, केंद्र सरकार अर्णव गोस्वामीवर ईतके मेहरबान का? देशाच्या सुरक्षे पेक्षा अर्णव महत्त्वाचा आहे का? असा प्रश्न करीत अर्णव गोस्वामीवर देशद्रोहाचा गुन्हा करुण अटक करण्याची मागणी केली. रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात किशोर धडके, सचिन गांधी, महादेव शेलार, महेश मिरानी, राजेश मलोत्रा, आसाराम टाक, नारायण गेमनानी, दिपक सोनोने, रोहित आव्हाड, सुशांत गायकवाड, सागर इंगळे, दिपक दुबे, अनिल यादव, गणेश मोरे, मनोज मिसाळ, मनिषा महांकाळे सुधा जोगळेकर, भारती फुलवारीया, फमिदा सय्यद, कुसुम महांकाळे, पवन मिरानी, अनूसुचित जाती विभाग उपाध्यक्ष रंजीत साळवे, भागवत तायडे, मनोज गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड आदी जण सहभागी झाले होते.