भिवंडी - भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे ठेवलेल्या एलकुंदे गावातील प्रेसिडेन्सी स्कूलमधील स्ट्राँगरूम बाहेर पहारा देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रीकांत पंदिरे या मोटारीत होमहवन करणा-या व्यक्ती विरोधात कोणतीही तक्रार दिली नाही. मात्र त्याचवेळी नायब तहसीलदार पंडित हे मंगळवारी सायंकाळी स्ट्राँगरुमला भेट देण्यास गेले असता पुन्हा कुणीतरी तेथे घुसल्याच्या अफवा पसरल्याने पोलिसांची व निवडणूक अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.स्ट्राँगरुमच्या बाहेर प्रथम केंद्रीय राखीव पोलीस दल, त्यानंतर राज्य राखीव पोलीस दल व त्यानंतर स्थानिक ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त आहे. स्ट्राँगरूमची बाहेरुन तपासणीसाठी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना निवडणूक अधिकाºयांनी प्रवेश पास दिले आहेत. या त्रिस्तरीय बंदोबस्ताने पास तपासल्यानंतर त्यांना स्ट्राँगरूमपर्यंत पोहोचता येते. या स्ट्राँगरूमबाहेर पहारा देणाºया काँग्रस कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपासून विविध शंका उपस्थित केल्याने अधिकाºयांची पळापळ झाली. स्ट्राँगरूम शेजारील इमारतीत शाळेचे कार्यालय असून शाळेचे अध्यक्ष महावीर जैन यांना भेटून आल्यानंतर व्यापारी श्रीकांत पंदिरे यांनी सूर्यास्ताची वेळ झाल्याने आपल्या मोटारीमध्येच हवन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे पाहिल्यावर गदारोळ झाला. त्यांनी निवडणूक अधिकाºयांना धारेवर धरले. आपण २२ वर्षापासून सूर्यास्तापूर्वी हवन करीत असल्याचे पंदिरे यांनी सांगितले व त्याची खातरजमा केल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे समाधान झाले.मंगळवारी नायब तहसिलदार पंडीत स्ट्राँगरूमची तपासणी करण्यास गेले असताना पुन्हा कुणीतरी आतमध्ये घुसल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे पुन्हा यंत्रणेची धावाधाव झाल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी दिली. स्ट्राँगरूमची सुरक्षा व दररोज उठणाºया अफवा याबाबत माहिती घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे व प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.स्ट्राँगरूमजवळ दररोज आठ तासाकरिता अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची ड्युटी लावली आहे. तेथे घडणा-या घडामोडीवर ते लक्ष ठेऊन आहे. त्यांना काही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्याची माहिती ते मला देतात. मोटारीमध्ये हवन करणा-या व्यापारी साधकाने स्पष्टीकरण दिल्याने त्याच्या विरोधात पोलीस तक्रार केली नाही. मात्र कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून आमचे कार्यकर्ते खबरदारी घेत आहेत.- सुरेश टावरे, काँग्रेस उमेदवार, भिवंडी लोकसभा मतदारसंघनिवडणूक निर्णय अधिकाºयांनी पास दिलेल्या अधिकाºयांनाच त्रिसदस्यीय पोलीस बंदोवस्तातून स्ट्राँगरूमपर्यंत पोहोचता येते. स्ट्राँगरूम परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा आहे. असे असताना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वारंवार येणाºया तक्रारींमुळे आता शाळेचे कार्यालयही बंद केले आहे.- संजय हजारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भिवंडी तालुकापोलीस ठाणे.
स्ट्राँगरुमच्या सुरक्षेवर काँग्रेसचा भरोसा नाय का? नायब तहसीलदाराच्या प्रवेशाने पुन्हा अफवांना ऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 1:22 AM