शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
3
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह
4
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला
5
देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
6
‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स
7
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
8
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
9
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
10
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
11
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
12
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
13
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
14
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
15
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
16
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
18
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
19
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
20
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान

पालकमंत्री शिष्टमंडळासह निवडणुक आयोगाकडे का गेले होते? आनंद परांजपे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 7:18 PM

प्रभाग रचना अंतिम करतांना त्याबाबत कोणत्याही प्रकारची बैठकही न होता ही प्रभाग रचना तयार कशी झाली असा सवालही त्यांनी केला. त्यातही प्रभाग रचनेत राष्ट्रवादीने हस्तक्षेप घेतलेला नाही, त्यामुळे त्यांना तसे वाटत असेल तर त्यांनी 14 तारखेला हरकत घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महापौर नरेश म्हस्के यांनी आरोप केल्यानंतर महापालिकेने तयार केलेली प्रभाग रचना ही जशीच्या तशी ठेवण्यासाठी ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या शिष्टमंडळासह प्रभाग रचना जाहीर होण्याच्या एक दिवस आधी गेले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.

 यासाठी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासावेत, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार, दोन आमदार महापौर नरेश म्हस्के आणि काही नगरसेवक गेले होते. ते निवडणुक आयोगावर दबाव टाकण्यासाठी गेले होते का? असा उलट सवाल त्यांनी केला आहे.  राष्ट्रवादीला कोणताही जुना आराखडा मिळाला नव्हता. परंतु त्यात काही तरी गडबड असल्याचे समजल्यानेच आव्हाड यांनी पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले. ेत्यातही म्हस्के यांना जर गोपनियता भंग झाले असे वाटत असेल तर त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करावी त्यांनी ते धाडस दाखवावे असे आव्हानही त्यांनी दिले.

प्रभाग रचना अंतिम करतांना त्याबाबत कोणत्याही प्रकारची बैठकही न होता ही प्रभाग रचना तयार कशी झाली असा सवालही त्यांनी केला. त्यातही प्रभाग रचनेत राष्ट्रवादीने हस्तक्षेप घेतलेला नाही, त्यामुळे त्यांना तसे वाटत असेल तर त्यांनी 14 तारखेला हरकत घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यातही गोपनीयेतचा भंग झाला असेल तर आयुक्तांच्या विरोधात तक्रार करण्याचे धाडस महापौरांनी दाखवावे. आयुक्तांनी शिवसेनेकडून उमेदवारी घ्यावी यावरुन म्हस्के यांनी परांजपे यांचा समाचार घेतला असतांनाच परांजपे यांनी म्हस्के यांच्यावर पलटवार करुन आयुक्तांनी म्हस्के यांना प्रवक्ता नेमले आहे का? असा उलट सवाल केला आहे.