शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

कल्याण-डोंबिवलीचा कचरा कल्याण पश्चिमेतच का? नगरसेवक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 1:08 AM

शहराच्या अन्य ठिकाणचा कचरा कल्याण पश्चिमेत नका आणू नका. कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण व डोंबिवलीतही प्रकल्प राबवा. अन्यथा कल्याण पश्चिमेतील प्रकल्प बंद पाडू

कल्याण : केडीएमसीने पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंग बंद केलेले नाही. तेथील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच उंबर्डे, बारावे, मांडा हे नवीन प्रकल्पही पश्चिमेत राबविले जात आहेत. शहराच्या अन्य ठिकाणचा कचरा कल्याण पश्चिमेत नका आणू नका. कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण व डोंबिवलीतही प्रकल्प राबवा. अन्यथा कल्याण पश्चिमेतील प्रकल्प बंद पाडू, असा संतप्त इशारा कल्याण पश्चिमेतील नगरसेवकांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे कल्याण पश्चिम विरुद्ध अन्य परिसर, असे चित्र सोमवारी महासभेत निर्माण झाले. यावेळी कल्याण पश्चिमेतील नगरसेवकांनी सभात्याग करण्याचा प्रयत्न केला असता चर्चेतून प्रश्न सोडवा सभात्यागाने काही होणार नाही, असे आवाहन अन्य सदस्यांनी केल्याने याविषयावर चर्चा झाली.पश्चिमेतील शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर यांनी पाइंट आॅफ आॅर्डरचा मुद्दा मांडत उंबर्डे येथे राबवला जाणारा प्रकल्प हा सरकारी नियमावलीस व न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून नाही. त्यामुळे प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच त्याचा प्रचंड त्रास उंबर्डेतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा प्रकल्प बंद करा. तसेच केवळ पश्चिमेत प्रकल्प राबवू नका. अन्य ठिकाणच्या कचरा प्रकल्पांंचे काय झाले, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. ही सभा तहकूब करून तातडीने सगळ्यांनी प्रकल्पाच्या पाहणीसाठी चला. तेथे प्रकल्प किती त्रासदायक आहे की नाही, हे सदस्यांनी ठरवावे. पाहणीअंतीच हे ठरविणे शक्य होईल, याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर महापौर विनीता राणे यांनी पॉइंट आॅफ आॅर्डरवर सभा तहकूब केली जाऊ शकत नाही. चर्चा करता येते, असे सांगितले.सभागृह नेते श्रेयस समेळ म्हणाले, प्रकल्प नियमानुसार नसेल तर त्याचा त्रास नागरिकांनी का सहन करायचा. आधारवाडी डम्पिंग बंद न केल्याने त्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात उंबर्डे प्रकल्पाची भर पडणार असेल तर भोईर यांची मागणी रास्त आहे. कचरा प्रकल्प कल्याण पूर्व, डोंबिवली आणि २७ गावातही राबविला जावा. अन्यथा तेथून येणा-या कचरा गाड्या पत्रीपुलावर रोखल्या जातील, असा इशारा त्यांनी दिला.उपमहापौर उपेक्षा भोईर म्हणाल्या की, विश्वनाथ राणे हे ज्येष्ठ सदस्य आहेत. मात्र, महापौर विनिता राणे या नव्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या त्रासाची जाण त्यांना अधिक नाही. उंबर्डेला इतका त्रास असेल तर मांड्याला प्रकल्प नकोच, अशी मागणी त्यांनी केली. तर, शिवसेना नगरसेविका शालीनी वायले म्हणाल्या, आधारवाडीच्या डम्पिंगच्या त्रासाने नागरिकांना कॅन्सर व क्षयरोगाचे आजार झाले आहेत. प्रशासन ठोस कारवाई कधी करणार आहे, याचे उत्तर द्यावे. डोंबिवलीतील कचºयाचा त्रास कल्याण पश्चिमेतील नागरिकांनीच का सहन करावा? त्यावर कल्याण पश्चिमेतील सदस्यांचा मुद्दा रास्त आहे, असे शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सांगितले. शिवसेना नगरसेवक मोहन उगले म्हणाले, कल्याण पश्चिमेतील नागरिकांनीच का हा त्रास सहन करावा, याकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले आहे. मात्र प्रशासनाकडून गांभीर्याने त्याची दखल घेतली जात नाही.दरम्यान, यावर प्रशासनाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने सदस्यांनी सभात्याग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी शिवसेना नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनी सभात्याग करून प्रश्न सुटणार नाही, असे सांगितले. त्यामुळे सदस्य पुन्हा सभागृहात आले. देवळेकर म्हणाले की, प्रकल्प राबविण्यासाठी प्रशासन कमी पडते. आयुक्तांचा त्यांच्यावर वचक नाही. त्याचबरोबर १०७ कोटी रुपये खर्चाचे कचरा गोळा करण्याचे कंत्राट चार प्रभाग क्षेत्रात आर अ‍ॅण्ड डी कंपनीला दिले आहे. या कंपनीकडे पुरेशा गाड्या व मनुष्यबळ नाही. मग महापालिका त्यांना कोणत्या कामाचा मोबदला देत आहे? त्यांचे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी केली. ओल्या कचºयाची विल्हेवाट लावली जात नसल्याने दुर्गंधीचा त्रासामुळे नागरिकांच्या रोषाला सदस्यांना समोरे जावे लागते, याकडे देवळेकर यांनी लक्ष वेधले.महापालिका आयुक्त गोविंद बोडके म्हणाले, प्रकल्प रद्द करता येणार नाही. त्यासाठी सरकारकडून पर्यावरण ना-हरकत दाखले मिळविले आहेत. त्यातील काही त्रुटी असतील त्यावर चर्चा करून तोडगा काढला जाईल. उंबर्डे व बारावे प्रकल्प सुरू केल्यावर आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद होईल. उंबर्डे प्रकल्प सुरू केला आहे. मात्र, तेथील त्रुटी दूर केल्या जातील. त्याचबरोबर १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प तयार करण्यात येत आहे. त्यापैकी पाच ठिकाणचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर, तीन ठिकाणी प्रक्रिया सुरू आहेत. या शिवाय सीएसआर फंडातून बारावे येथे प्रकल्प सुरू केला आहे. महापालिकेतील विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यकडे बैठक होणार होती. मात्र, ती काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली. या बैठकीच्या विषयांत कचºयाचा विषय समाविष्ट आहे. त्यावर तोडगा काढला जाईल. तसेच सदस्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तत्पूर्वी महापौरांसह सदस्यांना घेऊन चर्चा केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी सभेला दिले.आमदारांच्या पत्नीचाही सभात्यागाचा प्रयत्नकल्याण पश्चिमेत कचरा नको, याविषयावर आग्रही भूमिका मांडणारे नगरसेवक भोईर हे कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचे बंधू आहेत. त्याचबरोबर आमदार भोईर यांच्या पत्नी या देखील शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. यावेळी त्यांनीही सभात्याग करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कच-यावरून कल्याण पश्चिम विरुद्ध कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण २७ गावे आणि डोंबिवली पूर्व पश्चिम, असे चित्र तयार झाले. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण