- हितेन नाईकपालघर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मार्चपासून बंद असलेल्या परमिट रुम आणि हॉटेल्सना काही शर्ती-अटीवर परवानगी देण्यात आली असली तरी लोक अजूनही बाहेर पडण्यास धजावत नसल्याने व्यावसायिकांचे आर्थिक गणित साफ कोलमडले आहे. जिल्ह्यातील परमिट रूमधारकांचा मागील सहा महिन्यात १६२ कोटींचा तोटा झाल्याचा अंदाज व्यक्तकेला जात आहे. मे महिन्याच्या शेवटी शासनाने या परमिट रूमधारकांना पार्सलची मुभा दिली असली तरी जिल्ह्यातील ४१० परमिट रूमपैकी फक्त१४९ परमिटधारकांना आपला व्यवसाय सुरू ठेवणे शक्य झाले. तर हॉटेलमध्ये बसण्यास ग्राहकांना परवानगी नसल्याने पार्सल सेवेकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्यातच कोरोनामुळे कामगार आपल्या गावी निघून गेल्याने हॉटेल व्यवसायाचा कणा मोडून गेला आहे.घेतली जाणारी दक्षता : पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू झालेल्या हॉटेल्समध्ये पहिल्याच दिवशी शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे दक्षता बाळगली जात असल्याचे दिसून येत होते.काही हॉटेल्समध्ये कुटुंबीय जेवण आणि नाश्त्यासाठी एकत्र येत असताना एकाच टेबलावर ४ ते ५ जण बसत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते.स्थानिक प्रशासनाने घालून दिलेली बंधनेहॉटेल्स, परमिट रूममध्ये व बाहेर सॅनिटायझरची बाटली, थर्मल स्कॅनिंग, पल्समीटर्सची सोय उपलब्ध असणे, कर्मचाऱ्यांची वेळोवेळी तपासणी आणि ग्राहकांना बॉटल वॉटर, डिस्पोजेबल डिश वापरणे बंधनकारक केलेले आहे.खूप दिवसांनी, म्हणजे जवळजवळ सहा महिन्यांनी हॉटेलमध्ये एकत्र जेवण्याचा आस्वाद घेण्याचा योग आला असला तरी पूर्वीसारखी धम्माल कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे उपभोगतायेत नाही.- श्रुती तामोरे,ग्राहकपूर्वी २८ ते ३० हजारांचा दिवसाला धंदा व्हायचा, मात्र जेव्हापासून पार्सल सेवा सुरू झाली तेव्हापासून जेमतेम ४ ते ५ हजार धंदा होतोय. आता पुन्हा हॉटेल सुरू झाल्याने किती फरक पडतो ते पाहायचे.- रवींद्र शेट्टी,लोकमान्य हॉटेल, पालघरमेनूमध्ये घटमेनूकार्डात फारसा काही बदल झाल्याचे पाहावयास मिळाले नाही. सकाळचा नाश्ता आणि जेवणाचे मेनू जवळपास सारखे असले तरी जेवण बनविणारे काही कुक गावी तर काही नोकºया सोडून गेल्याने काही मेनूमध्ये काटछाट झाल्याचे दिसून आले.
व्यावसायिकांचे आर्थिक गणित सावरणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 12:58 AM