- जितेंद्र कालेकरठाणे : नंदुरबारच्या व्यापाऱ्याचे १० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाºया वर्तकनगर पोलीस ठाण्याचा पोलीस शिपाई दीपक वैरागडे याच्यासह दोघांना अटक केली असली, तरी या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याने आणखी कोणत्या पोलिसांच्या सहकार्याने हे कृत्य केले, याची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली.सोमवारी येऊर येथून रिजवान मेमन (२२) याला दीपक आणि त्याचा मित्र सोहेल पंजाबी यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला काल्हेरच्या एका लॉजवर ठेवले. त्या काळात ती त्याची पोलीस कोठडी असल्याचे त्याला सांगण्यात आले होते. नातेवाइकांकडून १० लाख रुपये खंडणी दिल्यास या कोठडीतून तुझी सुटका होईल, असेही त्याला सांगितले. दुसºया दिवशी मंगळवारीही त्याला एका भाड्याच्या कारमधून त्यांनी ठाणे, नवी मुंबईतील वाशी या परिसरात फिरवले. या काळात खंडणीसाठी त्याच्यावर प्रचंड मानसिक दबाव आणण्यात आला. भेदरल्यामुळे त्याने एका अंगडियामार्फत दोन लाख रुपयांची रोकड या दुकलीकडे स्वाधीन केली. ठाणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी दीपकसह दोघांना पकडल्यानंतर त्यांनी यापूर्वीही असेच प्रकार तीन वेळा केल्याची माहिती समोर आली. शिवाय, मिळालेले पैसे ते तीन ते चार जणांमध्ये वाटून घेत होते. यात एका पोलीस अधिकाºयाचेही नाव पुढे येत असल्याचे समजते. आता हा अधिकारी कोण? नक्की यात त्याचा समावेश आहे का? तसेच त्यांनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत का? यात त्यांनी कोणाकडून किती खंडणी उकळली? की आरोपींकडून दिशाभूल केली जात आहे. या सर्व बाबींचा तपशीलवार तपास करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाºयांची आणि अधिकाºयांचीही तसेच येऊरच्या ज्या बंगल्याचा सोहेलच्या मैत्रिणीने वापर केला, तो कोणाचा? त्याचा या प्रकरणाशी कितपत संबंध आहे? याचीही चौकशी केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले.सावधानता बाळगत घातली झडपअपहृत रिजवान हा अपहरणकर्त्यांच्या ताब्यात असल्यामुळे अत्यंत सावधानता बाळगून ठाणे ग्रामीण पोलिसांनी या अपहरणकर्त्यांना पकडले. पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर असताना दीपक आणि सोहेल हे दोघेही व्हिडीओ कॉलिंगद्वारे फोन करून रिजवानच्या वडिलांबरोबर पोलीस नसल्याची खात्री करत होते.शिवाय, आधी फाउंटन हॉटेल, नंतर मानपाडा असे वारंवार ठिकाण बदलणाºया अपहरणकर्त्यांकडून रिजवानच्या जीवालाही धोका होऊ शकत होता. परंतु, त्यांना गाफील ठेवून चाणाक्ष ग्रामीण पोलिसांनी या अपहरणकर्त्या दोघांनाही मोठ्या शिताफीने पकडले.
आणखीही पोलिसांची चौकशी होणार, यापूर्वीही केले ब्लॅकमेलिंगचे प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 6:13 AM