शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ठाणे होईल तेव्हा होईल, पण आधी उद्याने तर होऊ द्या स्मार्ट...

By admin | Published: April 17, 2017 4:54 AM

हुश्श... परीक्षा संपली एकदाची. आता फक्त मनसोक्त खेळायचे. एप्रिल- मे महिन्यांतील सुटी म्हणजे मुलांसाठी धम्माल आणि मस्ती. अभ्यासाच्या

प्रज्ञा म्हात्रे, ठाणेहुश्श... परीक्षा संपली एकदाची. आता फक्त मनसोक्त खेळायचे. एप्रिल- मे महिन्यांतील सुटी म्हणजे मुलांसाठी धम्माल आणि मस्ती. अभ्यासाच्या कटकटीतून बाहेर पडलेल्या मुलांचा सकाळसंध्याकाळ खेळण्याकडे ओढा असतो. पूर्वी मुलांचा मैदानी खेळांकडे कल होता. आता मैदाने कमी होत असल्याने मुलांना खेळण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे ही मुले मोबाइलवर गेम खेळण्यातच दंग असतात. शहरातील मैदानांबरोबरच उद्यानांचीही दुरवस्था झाली आहे. मुलांच्या मनोरंजनासाठी उभारलेल्या उद्यानांची अवस्था पाहून आता ती देखील लयास जातील का, अशी भीती निर्माण झाली आहे. उद्यानांच्या दुरवस्थेमुळे मुलांनी खेळायचे कुठे, असा प्रश्न समस्त पालकांनी उपस्थित केला आहे. इमारतीत खेळायला जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत. ज्या ठिकाणी जागा तेथे मुलांच्या खेळण्याचा त्रास होतो, हे कारण पुढे करून रहिवासी विरोध करतात. पालिका उद्याने बांधते. पण, कालांतराने त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करते, असा आरोप ठाण्यातील सुज्ञ नागरिकांनी केला आहे. उद्यानांचे नूतनीकरण केले जाईल, असे उद्यान विभागाकडून सांगितले जाते. मात्र, दरवर्षी वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. पालिकेच्या उदासीन कारभारामुळे आज मुलांसाठी असलेली उद्याने ही केवळ नावाला राहिली आहेत. ठाणे महापालिका आयुक्त ठाणे शहराला स्मार्ट सिटी करण्याकडे नेत असले, तरी दुसरीकडे या आयुक्तांनी उद्यानांकडेही लक्ष द्यावे, अशी माफक अपेक्षा समस्त ठाणेकरांकडून व्यक्त होत आहे. मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा आधी शहरात असलेल्या करमणुकीच्या, मनोरंजनाच्या गोष्टींकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. लुप्त होण्याच्या मार्गावर असणाऱ्या या उद्यानांना नवी संजीवनी मिळेल का, असा सवाल आता ठाणेकर विचारत आहेत. या समस्यांकडे पालिका कितपत लक्ष देईल, हाही एक यक्षप्रश्न आहेच. आज ठाणे शहरातील उद्यानांची अवस्था पाहिल्यास मुलांना तेथे खेळण्यासाठी का पाठवावे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. तुटलेली खेळणी, अस्वच्छता, मद्यपी, गर्दुल्ल्यांचा वावर असे चित्र बहुतांश उद्यानांमधील आहे. अशा परिस्थितीत आमची मुले खासकरून मुली सुरक्षित राहतील का, असा सवाल महिलांनी विचारला आहे. पालिका जर आमच्याकडून कर आकारते, तर उद्यानांना अवकळा का आली आहे. मग हे पैसे जातात कुठे? सुरक्षारक्षक नसल्याने या उद्यानांमधून सर्रास अनैतिक व्यवसाय सुरू असतात. आश्चर्य म्हणजे याकडे पालिका प्रशासन आणि नगरसेवकांचे लक्षही जात नाही. मुले, ज्येष्ठ नागरिक हे उद्यानांमध्ये विरंगुळा, स्वच्छ हवा मिळावी, यासाठी येतात. पण, त्यातील काहीच मिळत नाही. नागरिकांना बसण्यासाठी असलेली बाके मोडकळीस आली आहेत. खेळण्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. झाडे सुकलेली आहेत. मग, अशा परिस्थितीत नागरिकांना फ्रेश कसे वाटणार, हा खरा प्रश्न आहे. निवडणुका जवळ आल्या की, मतांसाठी पुळका येतो. निवडणुका झाल्या की, नेते आश्वासने विसरून जातात. ती उद्यानांमधील धुळीसोबत हवेत विरून जातात.