शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

पुन्हा कलानी जिंकणार की, आयलानी बाजी मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 12:24 AM

सदानंद नाईक। लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी व राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार ज्योती ...

सदानंद नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी व राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांच्यात थेट लढत आहे. मोदीलाटेत ज्योती कलानी यांनी आयलानी यांचा गेल्यावेळी अटीतटीच्या लढतीत पराभव केला होता. यावेळी एकूण १८ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत आयलानी व कलानी यांच्यात आहे.

महापालिकेत भाजप-ओमी कलानी यांच्या आघाडीची सत्ता असून पंचम कलानी महापौर आहेत. कलानी कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या चिन्हावर रिंगणात उतरल्या आहेत. धोकादायक इमारती, बंद पडलेला जीन्स उद्योग, अर्धवट विकासकामे, ३०० कोटींची योजना राबवूनही पाणीटंचाई, डम्पिंगचा प्रश्न, पालिकेतील भोंगळ कारभार आदींमुळे शहर भकास झाले. ओमी कलानी टीमची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता, भाजपने कलानी कुटुंबाला दूर सारल्याची चर्चा आहे. तरीही, कलानी कुटुंबाविषयी आकर्षण आहे. त्यामुळे येथील लढत निश्चितच अटीतटीची होणार आहे.जमेच्या बाजूशहरात पप्पू कलानी यांना मानणारा विशिष्ट वर्ग असून कलानी कुटुंबाचे आकर्षण कायम आहे. त्यांच्या काळातील काँक्रिटचे रस्ते आजही चांगल्या अवस्थेत आहेत. धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी चार चटईक्षेत्र मिळवून दिले. भुयारी गटारे, खेमानी नाला योजना कार्यान्वित तसेच सिंधी भवनला चालना, तर चालिया व झुलेलाल मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा मिळाला. गुन्हेगारीबाबत आवाज उठवला आहे.कुमार आयलानी यांचे चारित्र्य स्वच्छ असल्याने त्यांच्याबद्दल शहरात कुतूहल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळचा माणूस म्हणून ओळख आहे. त्यांची पत्नी मीना आयलानी महापौर असताना ३२० कोटींच्या निधीतून विविध विकासकामे व रस्त्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून होत आहे. मागील निवडणुकीत १८५० मतांनी पराभव झाला, तरी त्यापूर्वी पप्पू कलानी यांचा पराभव आयलानी यांनी केला होता.उणे बाजूगुन्हेगारी व रक्तरंजित राजकारणाचा ठपका कलानी कुटुंबावर बसला आहे. ज्योती कलानी निवडक समर्थकांसह राष्ट्रवादीत, तर मुलगा ओमी कलानी यांनी ओमी टीम स्थापन करून भाजपसोबत महापालिका सत्तेत आहेत. पंचम कलानी भाजपच्या तिकिटावर नगरसेवकपदी निवडून येऊन महापौर आहेत. ओमी टीमच्या पदाधिकाऱ्यांवरच गोळीबार, अपहरण, बलात्कार, हाणामारी आदी गुन्हे दाखल आहेत.\कुमार आयलानी हे राजकारणी कमी, तर व्यापारी जास्त असल्याची टीका होते. त्यांच्यावरही एका हत्येचा गुन्हा असून तो न्यायप्रविष्ट आहे. निवडणुकीदरम्यान भूमाफिया व तडीपार झालेल्यांना पक्षप्रवेश दिल्याने वादात सापडले. आयलानी हे कलानींपेक्षा कमी नाहीत, असा आरोप होत आहे. वादग्रस्त व मोठ्या गृहसंकुलांच्या बांधकाम व्यावसायिकांची जवळीक, कबरस्तान रद्द केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.