ठाणे : महिलांची त्यातही अल्पवयीन मुलीवर होणारे अत्याचार त्यांची सुरक्षा,वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्स या गुन्ह्यांना नियंत्रणात आणण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही ठाण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गुरुवारी दिली. मावळते आयुक्त जयजित सिह यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
जयजित सिहं यांची राज्याच्या लाच लुचपत विरोधी पथकात महासंचालक म्हणून बदली झाली होती. त्यांच्या जागी आता राज्य गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त महासंचालक डुंबरे यांची २५ वे आयुक्त म्हणून ठाणे शहर आयुक्तालयात बदली झाली आहे. आज दुपारी त्यांनी जयजित सिहं यांच्याकडून ठाण्याची सूत्रे घेतली.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा अशी ओळख असल्याने ठाण्यात तसे काम मोठ आहे. ठाण्यात तसे चॅलेंजिंग टास्क आहे. आता ही जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती आम्ही घेतली आहे.
भोगोलिक रचना संस्कृतीक दृष्ट्या ठाणे एक सुंदर शहर आहे. ठाणेकरही समजूतदार आहेत. येत्या दोन तीन दिवसात कामाचा आढावा घेतला जाईल. ठाण्यातील समस्या आणि गुन्हेगारी यांची आधी माहिती घेऊन त्यावर भाष्य करणे योग्य राहील. विकासासाठी ठाण्याची ओळख आहे. पूर्वीच्या तुलनेत आता या ठिकाणी खूप विकास झाला आहे.. ठाण्यात वाहतुकीची समस्या आहे,पण त्यावर मार्ग काढता येईल.
या आधी ठाण्यात काम केलं आहे. त्याचाही चांगल्या प्रकारे खूप उपयोग होईल महिला सुरक्षा,वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्स यावर खास नजर ठेवणार आहे. पोलिस वसाहत आणि पोलिसांच्या घरांबाबतही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं.